Motorola G14 लवकरच येऊ शकतो बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट

Highlights

  • टीडीआरएसवर फोनचा मॉडेल नंबर XT2341-4 आहे.
  • डिवाइस बजेट रेंज मध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • ह्यात Motorola G13 सारखे फीचर्स मिळू शकतात.

मोटोरोला सध्या आपल्या G-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे कंपनी Motorola G14 स्मार्टफोन बाजारात लाँच करू शकते. अलीकडेच डिवाइस EEC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. आता हा फोन टीडीआरए साइटवर लिस्ट झाला आहे. ह्या सर्टिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G14 टीडीआरए लिस्टिंग

जो फोन टीडीआरएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे ज्याचा मॉडेल नंबर XT2341-4 आहे. ह्या लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनचं नाव कंफर्म झालं आहे. सांगितलं जात आहे की हा बजेट रेंजमध्ये सादर केला जाईल. त्याचबरोबर आशा आहे की हा डिवाइस कंपनी लवकरच लाँच करेल. परंतु ह्या लिस्टिंगमध्ये मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

जुन्या Moto G13 फीचर्स

नवीन Moto G14 स्मार्टफोन Moto G13 ची जागा घेऊ शकतो. त्यामुळे स्पेसिफिकेशन देखील मिळते जुळते असू शकतात. म्हणून पुढे आम्ही Moto G13 डिवाइसचे स्पेसिफिकेशन सांगितले आहेत त्यावरून तुम्ही नवीन जी14 कसा असेल ह्याचा अंदाज लावू शकता.

  • डिस्प्ले: Moto G13 मध्ये युजर्सना 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 1600 x 720 चं पिक्सल रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. डिस्प्लेवर पंच-होल डिजाइन देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर: हा मोबाइल कमी बजेटमध्ये येत असल्यामुळे MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी: डिवाइस 5000mAh बॅटरी आणि 10 वॉट चार्जिंग सपोर्टसह येतो.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • इतर: अन्य फीचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 4G, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक बेसिक फीचर्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here