मोटोरोलाच्या मोटो झेड 4 स्मार्टफोन बद्दल अनेक लीक्स येत आहेत. चर्चा अशी आहे कि मोटो झेड4 च्या रूपात कंपनी आपला 5जी स्मार्टफोन टेक मंचावर सादर करेल. मोटो झेड4 लॉन्च होण्यास थोडा वेळ लागू शकतो पण फोन बाजारात येण्यापूर्वीच 91मोबाईल्स मोटो झेड4 ची एक्सक्लूसिव रेंडर ईमेज घेऊन आला आहे. या रेंडर्स मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. या फोटोज वरून फक्त मोटो झेड4 च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली नाही तर सोबतच फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.
मोटो झेड4 ची डिजाईन
मोटो झेड4 कर्व्ड एज डिस्प्ले वर बनलेला दाखवण्यात आला आहे. फोनचा फ्रंट पॅनलच्या चारही कडा नॅरो बेजल्स वाल्या आहेत. फोन मध्ये एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो झेड4 च्या बॅक पॅनल वर राउंड शेप मध्ये रियर कॅमेरा सेटअप आहे जो फ्लॅश लाईट सह येतो. या सेटअप मध्ये सिंगल कॅमेरा सेंसरच देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली मोटोचा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असू शकतो.
मोटो झेड4 च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला सर्किट्स आहेत ज्यावरून समजते कि मोटो झेड4 ला मोटो मॉड जोडता येतील. मोटो झेड4 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर तसेच पावर बटण देण्यात आले आहेत. तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. यूएसबी पोर्ट फोनच्या खालच्या पॅनल वर देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या वर स्पीकर ग्रिल आहे. फोनच्या खालच्या पॅनल वरच 3.5एमएम जॅक पण दिला जाऊ शकतो.
मोटो झेड4 स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा अजून झाला नाही पण आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार मोटो झेड4 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 मिळेल. मोटो झेड3 प्रमाणे हा फोन पण मोटो 5जी मॉडला सपोर्ट करेल.
लीक नुसार मोटो झेड4 मध्ये फोटोग्राफी साठी 48-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. चर्चा अशी आहे कि मोटो झेड4 मध्ये हा कॅमेरा सेंसर सोनी आईएमएक्स असेल. लीक्स मधून समोर आले आहे कि मोटो झेड4 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह येईल. मोटोरोला द्वारा हा फोन 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. अशा आहे कि कंपनी हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल.
मोटो झेड4 बद्दल अजूनतरी मोटोरोलाने कोणतीही घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या फोनचे स्पेफिकेशन्स खरे म्हणता येणार नाहीत. आशा आहे कि पहिल्या सहामाहीत मोटो झेड4 टेक बाजारात येईल.