फ्लिप फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra भारतात लाँच, फीचर्स आहेत दमदार

Highlights

  • Motorola Razr 40 सीरीजच्या दोन्ही फोन्समध्ये क्लॅमशेल डिजाइन आहे.
  • Motorola Razr 40 सीरीजची विक्री अ‍ॅमेझॉनवरून केली जाईल.
  • दोन्ही फ्लिप फोन भारतात येण्यापूर्वी ग्लोबली सादर करण्यात आले आहेत.

Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra फ्लिप फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हे मोटोच्या प्रीमियम फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आले आहेत. तसेच सीरीजमध्ये आलेला मोठा मॉडेल मोटोरोला रेजर 40 अल्ट्रा पाहता यात 3.6 इंचाची मोठी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे, जी क्लॅमशेल मॉडेलमधील मोठी आहे.

Moto Razr 40 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

  • Motorola Razr 40 Ultra कंपनीनं 89,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे.
  • Moto Razr 40 ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

फोनची विक्री भारतात अ‍ॅमेझॉनसह रिलायन्स डिजिटलवर केली जाईल. फोनसाठी युजर्सना डिस्काउंट ऑफर देखील दिली जात आहे. तसेच अल्ट्रा मॉडेलवर आयसीआयसीआय बँक कार्ड धारकांना 7000 रुपयांपर्यंतची सूट आणि बेस मॉडेलवर 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

Motorola Razr 40 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Motorola Razr 40 फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा एचडी + OLED पॅनल देण्यात आला आहे. ज्यात 2640 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 413 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी, 10-बिट कलर, एचडीआर 10 + सपोर्ट मिळतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 7 देण्यात आलं आहे.
  • दुसरा डिस्प्ले : Motorola Razr 40 च्या बॅक पॅनलवर 1.47 इंचाची छोटी कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. हा देखील OLED पॅनल आहे ज्यात 194 x 368 पिक्सल रिजोल्यूशन मिळतो.
  • प्रोसेसर : फोल्ड होणाऱ्या Razr 40 मध्ये कंपनीनं स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट दिला आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम +256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते.
  • बॅटरी : डिवाइस 4200mAh बॅटरीसह आला आहे ज्यात 30W फास्ट चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • कॅमेरा : फोनमध्ये OIS सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स आहेत.
  • अन्य फीचर्स : Razr 40 ला IP52 रेटिंग मिळाली आहे. ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून हा सुरक्षित राहतो.

Motorola Razr 40 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Motorola Razr 40 Ultra फोल्डेबल फोनमध्ये 6.9 इंचाचा pOLED डिस्ले आहे. ज्यात 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसेच दुसरा डिस्प्ले 3.6 इंचाचा आहे. ह्यात देखील 144Hz रिफ्रेश रेटसह 1066 x 1056 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं.
  • प्रोसेसर : हा डिवाइस आणि दमदार ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटसह आला आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत फोन 12GB LPDDR5 रॅम +512GB स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : Razr 40 Ultra मध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात f/1.5 अपर्चर असलेली 12MP ची प्रायमरी लेन्स आणि f/2.2 अपर्चर असलेली 13MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.4 अपर्चर असलेला 32MP ची कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : मोटोरोलाच्या ह्या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 3,800mAh बॅटरी आहे. जी वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये ड्युअल-सिम 5जी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ वी5.3 सारखे फीचर्स मिळतात.
  • अन्य फीचर्स : Razr 40 Ultra ला IP52 रेटिंग मिळाली आहे. जिच्या मदतीनं पाणी आणि धुळीपासून बचाव होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here