Oppo Reno8 T सारखा आणखी नवीन 5G स्मार्टफोन; कंपनीनं सुरु केली भारतात टेस्टिंग

Highlights

  • कंपनी एक नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात सादर करेल.
  • फोनचा मॉडेल नंबर OPPO CPH2527 असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • Oppo Reno8 T 5G सारख्या डिजाइनसह येईल हा फोन

चिनी मोबाइल निर्माता कंपनी Oppo भारतीय बाजारात सध्या जास्तच सक्रिय झाली आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी Oppo Reno8 T 5G नावाचा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला होता. आता असाच आणखी एक स्मार्टफोन कंपनी लाँच करण्याची तयारी करत आहे. 91मोबाइल्सला माहिती मिळाली आहे की ओप्पो एका नवीन 5G डिवाइसवर काम करत आहे, जो बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या आगामी 5G डिवाइसची डिजाइन Oppo Reno 8 T 5G सारखी असेल.

OPPO 5G Phone launch

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी एका नवीन 5G डिवाइस भारतात टेस्ट करत आहे. ज्याचा मॉडेल नंबर OPPO CPH2527 आहे. या फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की नवीन स्मार्टफोनमध्ये कर्व डिस्प्ले मिळणार नाही. सध्यातरी आगामी स्मार्टफोन बाबत जास्त माहिती मिळली नाही, परंतु लवकरच अधिक माहिती येऊन चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या Oppo Reno 8T 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स पाहूया. हे देखील वाचा: पाकिस्तानातील ‘हीरामंडी’ वर आधारित सीरीजचा Teaser झाला रिलीज; कुठे आणि कधी होणार स्ट्रीम, जाणून घ्या

OPPO Reno8 T 5G Specifications

  • 6.57-इंच कर्व्ड OLED पॅनल, 120Hz रिफ्रेश रेट
  • 8GB रॅम +128GB स्टोरेज
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर
  • 4,800mAh बॅटरी, 67W सुपरवूक चार्जिंग
  • 108MP ट्रिपल रियर कॅमेरा

Oppo Reno 8T स्मार्टफोन मायक्रो कर्व डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. Oppo च्या या फोनचे वजन फक्त 171 ग्राम आहे आणि हा 7.7mm स्लिम आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डावीकडे ड्युअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, जे दोन कॅमेरा रिंग आहेत. या फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. जो 10-bit कलर डेप्थ सपोर्टसह Dragontrail-Star2 च्या सुरक्षेसह येतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला शे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी अनेक फीचर्स मिळतात.

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G SoC सह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आला आहे. तर ओप्पोची रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजी देखली फोनमध्ये मिळते, जिच्या मदतीने रॅम 8GB पर्यंत वाढवता येतो. फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: चिनी नव्हे स्वदेशी कंपनीनं देणार स्वस्तात 7GB रॅम; Lava Yuva 2 Pro ची किंमत व स्पेसिफिकेशन लीक

ओप्पोचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित ColorOS 13 वर चालतो. ओप्पोचा दावा आहे की हा फोन बॅकग्राउंडमध्ये एका वेळी 13 अ‍ॅप्स कोणत्याही लॅगविना रन करू शकतो. फोनमध्ये 4,800mAh ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here