
बॉलीवुडचे प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साळी ओटीटीच्या दुनियेत पाऊल टाकण्यासाठी तयार आहेत. ता आपल्या नवीन वेब सीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर येत आहेत, जिचे नाव ‘हीरामंडी’ आहे. Heeramandir Web Series चा टीजर जारी करून सीरिजचा फर्स्ट लुक व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आला आहे, ज्यात बॉलिवुडच्या अनेक मशहूर लोकप्रिय अभिनेत्र्या दिसत आहेत.
Heeramandi टीजर
संजय लीला भन्साळी यांच्या अपकमिंग वेब सीरीज हीरामंडीचा टीजर जारी करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारीला OTT प्लॅटफॉर्म Netflix नं हीरामंडीचा फर्स्ट लुक जारी केला गेला आहे. सीरिजच्या फर्स्ट लुकमध्ये एकत्र अनेक बॉलिवुड अभिनेत्र्या दाखवण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप या सीरिजच्या रिलीज डेटचा खुलासा झाला नाही. हे देखील वाचा: दूरदर्शनच्या जुन्या मालिका येणार ऑनलाइन; प्रसार भारतीसाठी तयार होत आहे नवीन OTT प्लॅटफॉर्म
Another time, another era, another magical world created by Sanjay Leela Bhansali that we can’t wait to be a part of. Here is a glimpse into the beautiful world of #Heeramandi ?
Coming soon! pic.twitter.com/tv729JHXOE
— Netflix India (@NetflixIndia) February 18, 2023
Heeramandi Star Cast
या वेब सीरीजमध्ये मनीषा कोयराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेगल सारख्या शानदार बॉलिवुड अभिनेत्र्या असतील. तसेच सीरीजच्या फर्स्ट लुकमध्ये सर्व रॉयल लुकमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. सीरीजचा टीजर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चाना उधाण आलं आहे.
Heeramandi स्टोरी
आगामी वेब सीरीज हीरामंडीची गोष्ट भारतीय स्वातंत्र्य पूर्व काळातील आहे. ज्यात सध्याच्या पाकिस्तानातील Heeramandi जागेची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा एक रेडलाइट एरिया होता जो ‘शाही मोहल्ला’ नावाने देखील ओळखला जातो. फाळणीच्या आधी ‘हीरामंडी’ च्या वेश्या देशभरात प्रसिद्ध होत्या. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा करण जोहरच्या कलंकमध्ये हिरांमंडीच्या नावाचा उल्लेख आला होता. त्यानंतर आता भन्साळी यांची सीरिज येत आहे. हे देखील वाचा: सर्वांच्या हातात असेल हा लो बजेट स्मार्टफोन; Redmi 12C ची लाँच डेट आली
या परिसराला राजकीय, सामाजिक इतिहास असल्याचे सांगितलं जातं. मुघलांच्या काळात अफगाणिस्तान, उजबेकिस्तानमधून हिरामंडीमध्ये मुली वेश्याव्यवसायासाठी आणल्या जात. ती एक मोठी बाजारपेठ होती. त्याकाळात वेश्याव्यवसायाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिले जात होते. मुघलकाळात या व्यवसायाकडे सांस्कृतिक भूमिकेतून पाहिलं गेलं. राजा महाराजांचे मनोरंजन करण्यासाठी तो भाग प्रसिद्ध होता. ‘हीरामंडी’ हे नाव शीख महाराजा रणजीत सिंह यांचे मंत्री हीरा सिंह डोगरा यांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं. ‘हीरा सिंह’ यांनी याच जागेवर धान्याची एक मंडई स्थापन केली होती. जिचं नंतर रूपांतर वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हीरामंडीमध्ये झालं.














