चिनी नव्हे स्वदेशी कंपनीनं देणार स्वस्तात 7GB रॅम; Lava Yuva 2 Pro ची किंमत व स्पेसिफिकेशन लीक

Highlights

  • Lava Yuva Pro स्मार्टफोन मुंबईत ऑफलाइन बाजारात विकला जात आहे
  • फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज
  • Lava Yuva 2 Pro ची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava आपला नवीन 5G स्मार्टफोन लवकरच सादर करणार आहे. आगामी Lava Agni 2 5G ची वाट पाहत असताना आता कंपनी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. नवीन Lava Yuva 2 Pro स्मार्टफोन ऑफलाइन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 7,779 रुपयांमध्ये आलेल्या Lava Yuva Pro चा उत्तराधिकारी आहे.

Lava Yuva 2 Proची किंमत आणि उपलब्धता

जरी लावानं भारतात लाँच संबंधित कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी Lava Yuva 2 Pro स्मार्टफोन आधीपासून भारतीय बाजारातील दुकानांमध्ये उपलब्ध झाला आहे. मुंबईतील दोन ऑफलाइन रिटेलर्स युवा 2 प्रो स्मार्टफोन विकू लागले आहेत, अशी माहिती गिजमोचायना या वेबसाइटनं दिली आहे. दोन्ही रिटेलर्स या डिवाइसचा 4GB RAM व 64GB स्टोरजे असलेला मॉडेल 8,499 रुपयांमध्ये विकत आहेत. हा फोन पर्पल व्हाइट आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: सर्वांच्या हातात असेल हा लो बजेट स्मार्टफोन; Redmi 12C ची लाँच डेट आली

Lava Yuva 2 Pro specifications

Lava Yuva 2 Pro स्मार्टफोनची डिजाईन पाहत फोनमधील रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश नवीन आयफोन सारखा दिसत आहे. या फोनच्या फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच असेल, असा अंदाज लावला जात आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Lava Yuva 2 Pro स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक एलसीडी पॅनल आहे जो एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील व्हर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 3GB अतिरिक्त रॅम मिळून एकूण 7GB रॅमची पावर मिळते. हे देखील वाचा: पाकिस्तानातील ‘हीरामंडी’ वर आधारित सीरीजचा Teaser झाला रिलीज; कुठे आणि कधी होणार स्ट्रीम, जाणून घ्या

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, तर जोडीला एक व्हीजीए सेन्सर देण्यात आला आहे. तर फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हा फोन 5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह बाजारात आहे. ज्यात यूएसबी सी चार्जिंग पोर्ट मिळतो. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here