डुअल कॅमेरा, 6जीबी रॅम, नॉच स्क्रीन आणि दमदार प्रोसेसर सह लॉन्च झाला नोकिया 8.1 प्लस, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही

एचएमडी ग्लोबल ब्रँड नोकियाच्या नवीन फोन 8.1 प्लसची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. आज कंपनी ने हा फोन जगासमोर आणला आहे. दुबई मध्ये आयोजित एका कॉन्फ्रेंस मधून कंपनी ने हा फोन लॉन्च केला आहे. बोलले जात होते की नुकताच चीन मध्ये लॉन्च झालेला नोकिया एक्स7 नोकिया 8.1 नावाने ग्लोबल बाजारात उपलब्ध होईल आणि फोन लॉन्च झाल्यानंतर हेच खरे झाले. नोकिया 8.1 चे स्पेसिफिकेशन जवळपास एक्स7 सारखेच आहेत. फोन लॉन्च ने कंपनी ने याची जागतिक उपलब्धता सांगितली ज्यात भारताचा पण समावेश आहे. 10 डिसेंबरला एचएमडी ग्लोबल द्वारा भारतात एक इवेंट केला जात आहे आणि आशा आहे की तेव्हा कंपनी नोकिया 8.1 लॉन्च करेल.

नोकिया 8.1 चे स्पेसिफिकेशन्स
नोकिया 8.1 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता यात 18.7:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले आहे. फोनच्या वरच्या भागात नॉच आहे. नॉच वर तुम्हाला सेल्फी कॅमेरा सह सेंसर्स पण दिसतील. कंपनी ने 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.18-इंचाची टीएफटी स्क्रीन दिली आहे जी गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. मेटल फ्रेम वर बनलेला हा फोन ग्लास बॅक पॅनल मध्ये उपलब्ध आहे. फोनची क्वालिटी शानदार आहे. साइड पॅनल मध्ये डायमंड कटचा वापर करण्यात आला आहे जो याला आकर्षक बनवतो. मागील पॅनल मधेच तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. नोकिया 8.1 एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई सह सादर करण्यात आला आहे.

हा फोन स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये आॅक्टाकोर (2.2 गीगाहट्र्ज, डुअल कोर, क्रयो 360 + 1.7गीगाहट्र्ज, हेक्सा कोर, क्रयो 360) प्रोसेसर देण्यात आला आहे. नोकिया 8.1 ग्लोबल मार्केट मध्ये दोन रॅम वेरिएंट आणि तीन मेमरी वेरियंट मध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसरा वेरिएंट 6जीबी रॅम सोबत 64जीबी मेमरी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आॅप्शन्स सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 400जीबी पर्यंतचे माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा कार्ल जेसिस लेंस सह चांगली फोटोग्राफी कर शकतो. तसेच नोकिया 8.1 च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

नोकिया 8.1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देत आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी नोकिया 8.1 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लू सिल्वर, स्टील कॉपर आणि आयरन स्टील सहित तीन रंगांत उपलब्ध होईल. याची किंमत 399 यूरो पासून सुरु होते जी भारतीय करन्सीनुसार जवळपास 31,000 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here