Nothing Phone 2 स्मार्टफोनच्या मॉडेल नंबर, लाँच टाइमलाइन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक

Highlights

  • Nothing Phone (2) 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता.
  • टिपस्टरला स्मार्टफोनची कथित बॅटरी BIS वेबसाइटवर दिसली आहे.
  • Nothing Phone (2) मध्ये प्रीमियम फ्लॅगशिप ग्रेड अनुभव मिळू शकतो.

Nothing Phone (1) च्या यशस्वी लाँच नंतर लंडनमधील टेक कंपनी नथिंग यंदा या स्मार्टफोनचा उत्तराधिकारी Nothing Phone (2) सादर करण्याची तयारी करत आहे. MySmartPrice च्या एका रिपोर्टमधून या स्मार्टफोनच्या मॉडेल नंबर, लाँच टाइमलाइन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन प्रीमियम फ्लॅगशिप ग्रेड अनुभव देऊ शकतो.

दरम्यान टिपस्टर मुकुल शर्मानं या स्मार्टफोनची बॅटरी Nothing NT02 मॉडेल नंबरसह भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइट BIS वर पहिली आहे. त्यामुळे हा फोन भारतात देखील येऊ शकतो याची पुष्टी झाली आहे. Nothing NT01 मॉडेल नंबर असलेली बॅटरी नथिंग फोन (1) मध्ये वापरण्यात आली होती, त्यामुळे Nothing NT02 बॅटरीचा समावेश नथिंग फोन (2) मध्ये केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे.हे देखील वाचा: डीटेल्ड फोटोजसाठी 108MP Camera! POCO X5 Pro 5G देणार का Realme ला टक्कर?

Nothing Phone (2) कधी येणार भारतात

नथिंग फोन (1) भारतात जुलै 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु रिपोर्टनुसार नथिंग फोन (2) 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान जगभरात लाँच केला जाऊ शकतो, ज्यात भारताचा समावेश असण्याची देखील शक्यता आहे. परंतु स्मार्टफोनच्या लाँचची अचूक तारीख मात्र अद्याप समजली नाही.

नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी काही दिवसांपूर्वी सुचवलं होतं की नथिंग फोन (2) सर्वप्रथम युनायटेड स्टेट्समध्ये सादर केला जाईल. यावेळी कंपनी अमेरिकेला प्राधान्य देणार आहे. तसेच त्यांनी सांगितलं होतं की हा स्मार्टफोन आधीपेक्षा जास्त प्रीमियम असेल आणि यातील सॉफ्टवेयरवर जास्त भर दिला जाईल.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स

रिपोर्टनुसार आगामी Nothing Phone (2) चा मॉडेल नंबर ‘A065’ आहे. तसेच या फोनमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. Nothing Phone (2) मध्ये क्वॉलकॉमच्या Snapdragon 8 सीरिजचा चिपसेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर या फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच आगामी नथिंग फोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देखील मिळू शकते. हे देखील वाचा: स्वस्त 5G Phone हवा? मग Realme 10T 5G साठी काही दिवस थांबा; असे असतील स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये मिडरेंज चिपसेट आणि छोटी बॅटरी देण्यात आली होती. परंतु आगामी फोनमध्ये फ्लॅगशिप ग्रेड प्रोसेसर आणि मोठी बॅटरी मिळू शकते. त्यामुळे नवीन फोन नक्कीच पावरफुल असेल असं दिसतंय. नथिंग फोन (1) कडे जगाचं लक्ष वेधलं गेलं ते स्मार्टफोनच्या हटके डिजाइनमुळे ज्यात कंपनीनं बॅक पॅनलवर एलईडी लाइट्सचा वापर केला होता. आता हीच डिजाइन नव्या फोनमध्ये मिळते की नाही ते पाहावं लागेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here