पुढील आठवड्यात 18 जानेवारीला भारतात येऊ शकतो Samsung Galaxy A23 5G

सॅमसंग इंडियानं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात आपले दोन नवीन 5जी फोन सादर करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये येतील जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावाने लाँच केले जातील. लाँच डेटच्या घोषणेनंतर कंपनीनं गॅलेक्सी ए23 5जी व ए14 5जी टीज करण्यास सुरुवात केली आहे तसेच हे दोन्ही स्वस्त सॅमसंग 5जी फोन असतील.

Samsung Galaxy A23 5G भारतीय लाँच डेट

सॅमसंगनं आपल्या अधिकृत वेबसाइटवर लाँच इव्हेंटचं पेज लाइव्ह केलं आहे. त्याचबरोबर कंपनीनं ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन 18 जानेवारीला भारतात लाँच होईल. या स्मार्टफोन सोबतच कंपनी गॅलेक्सी ए14 5जी देखील भारतीय बाजारात आणेल. सॅमसंग हे ‘ए’ सीरीज स्मार्टफोन्स Awesome 5G टॅगलाईनसह प्रोमोट करत आहे. हे देखील वाचा: 14 जानेवारीला भारतात येतोय OPPO चा दमदार 5G Phone; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी ए23 5जी फोन अमेरिकन मार्केटमध्ये आधीच लाँच झाला आहे. परंतु आम्हाला आशा आहे की भारतात लाँच होणारा हा स्मार्टफोन ग्लोबल मॉडेलपेक्षा वेगळा असू शकतो. सॅमसंग इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रोडक्ट पेजवर या फोन संबंधित काही माहिती मिळाली आहे जी पुढे देण्यात आली आहे.

कंपनीनुसार गॅलेक्सी ए23 5जी फोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. फोटोवरून समजलं आहे की हा वॉटरड्रॉप नॉच स्क्रीनसह बाजारात येऊ शकतो ज्यात तीन कडा बेजल लेस असू शकतात तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतो. आशा आहे की या फोनमध्ये एलसीडी पॅनलचा वापर केला जाईल जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासद्वारे प्रोटेक्टेड असू शकतो.

Samsung Galaxy A23 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. मेगापिक्सलची माहिती मात्र मिळाली नाही परंतु आशा आहे की यात एक मॅक्रो सेन्सर असेल. तसेच हा सॅमसंग फोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. फक्त कॅमेरा नव्हे तर फोनच्या बॅटरीमध्ये एआय टेक्नॉलॉजी मिळू शकते जी 2 दिवसांचा बॅकअप देण्यास मदत करू शकते. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM ची ताकद; बजेटमध्ये दमदार गेमिंग परफॉर्मन्ससाठी Realme 10 भारतात लाँच

Samsung Galaxy A23 5G ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे अन्य दोन सेंट मिळतात. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here