Nokia स्मार्ट टीव्ही भारतात 5 डिसेंबरला होईल लॉन्च, समोर आली माहिती

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

आतापर्यंत स्मार्टफोन आणि फीचर फोन बनवण्यासाठी ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली Nokia आपला पहिला स्मार्ट टीव्ही आणण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे. माहितीनुसार Nokia ब्रँडचा स्मार्ट Tv 5 डिसेंबरला लॉन्च केला जाईल. काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि फ्लिपकार्ट भारतात नोकिया ब्रँडचा टीव्ही लॉन्च करण्याची योजना बनवत आहे.

या टीव्हीच्या अधिकृत लॉन्चच्या तारखेची घोषणा केली गेली आहे. फ्लिपकार्टने एखाद्या मोठ्या ब्रँड सोबत मिळून टीव्ही लॉन्च करण्याची हि दुसरी वेळ आहे. काही महिन्यांपूर्वी फ्लिपकार्टने Motorola कंपनी सोबत मिळून टीव्ही लॉन्च केली होती. प्रेस इनवाइट मध्ये टीव्ही च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लॉन्चच्या वेळी किती मॉडेल लॉन्च केले जातात हे बघावे लागेल आणि या मॉडेल्सच्या किंमतीवर पण लक्ष द्यावे लागेल.

साउंड असेल खास

पहिल्यांदाच JBL ने टेलीविजन प्रोडक्ट सोबत भागेदारी केली आहे. Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स दिले जातील जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतील. रिपोर्टनुसार Nokia Smart TV साउंडच्या बाबतीत खास असतील आणि या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशन मिळेल. नोकियाचा हा टेलीविजन 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: Xiaomi ला टक्कर देण्यासाठी Motorola ने सादर केली Smart TV, किंमत 13,999 पासून सुरु

Nokia Smart TV

नोकिया ब्रँडच्या या पहिल्या स्मार्ट टेलीविजनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक मध्ये समोर आले आहे कि कंपनी द्वारा लॉन्च केली जाणारी टीव्ही 55-इंचाची असेल. बोलले जात आहे कि हि टीव्ही 4K अल्ट्रा एचडी पॅनल सह येईल जो शानदार विजुअल क्वॉलिटी देईल. Nokia स्मार्ट टेलीविजन एंडरॉयड 9.0 पाई ओएस सह येईल. लीकनुसार या टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी चा वापर केला जाईल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलची साउंड सिस्टम असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here