Nothing Phone (2) च्या भारतीय लाँच आणि डिस्प्ले साइज कन्फर्म, फ्लिपकार्टवरून होईल विक्री

Highlights

  • फोन बनवताना राइसायकलेबल आणि बायो-बेस्ड मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.
  • नथिंग फोन 2 मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल.
  • नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष Android अपडेट्स दिले जातील.

Nothing Phone (2) स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत पुष्टी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या सीईओनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की फोन जुलैमध्ये लाँच होईल. तसेच स्पष्ट झालं आहे की ग्लोबल मार्केटसह हा फोन भारतात देखील येऊ शकतो, ज्याचा खुलासा Flipkart लिस्टिंगवरून झाला आहे. तसेच, कंपनी आता हळूहळू ह्या स्मार्टफोनची माहिती समोर आणत आहे.

फ्लिपकार्टवर सह लिस्ट झाला Nothing Phone (2)

फ्लिपकार्टवर फोनसाठी वेगळी मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे. परंतु अजूनही इंडिया लाँच बद्दल साइटवर कोणतीही माहिती मिळाली नाही. तर दुसरीकडे Nothing नं आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलच्या माध्यमातून Nothing Phone (1) फोनच्या उत्तराधिकारी Nothing Phone (2) संबंधित नवीन माहिती दिली आहे.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स

  • या फोनमध्ये जुन्या फोनच्या तुलनेत 0.15 इंच मोठा डिस्प्ले मिळेल. म्हणजे नंथिंग फोन 1 मध्ये 6.55-इंचाची डिस्प्ले साइज होती तर नथिंग फोन 2 मध्ये 6.7-इंचाची स्क्रीन असेल.
  • कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते आपल्या ह्या नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोनला 3 वर्ष Android अपडेट्स देतील.
  • तसेच फोनमध्ये 4 वर्ष युजर्सना सिक्योरिटी पॅच अपडेट मिळतील.
  • फोन 4,700mAh बॅटरीसह बाजारात येईल. म्हणजे कंपनीनं जुन्या फोन पेक्षा 200mAh बॅटरी वाढवली आहे.
  • ह्याआधी Carl Pei अधिकृतपणे सांगितलं आहे की Nothing Phone (2) फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल.

रिसायकलेबल मटेरियलपासून बनतील फोनचे पार्ट्स

अलीकडेच ट्विट करून कंपनीनं माहिती दिली आहे की कंपनी जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन फोनच्या जास्तीत जास्त पार्ट्समध्ये तिप्पट रिसायकलेबल आणि बायो-बेस्ड प्रोडक्ट्सचा वापर करत आहे. 9 सर्किट बोर्ड्समध्ये 100 टक्के रीसायकल टीन, मेन सर्किट बोर्डवर 100 टक्के रीसायकल कॉपर फॉइल आणि 28 स्टील पोर्ट्स वर 90 टक्के रीसायकल स्टीलचा वापर केला गेला आहे.

प्लास्टिक फ्री पॅकेजिंग सह येईल नथिंग फोन 2

इतकेच नव्हे तर नथिंग फोन 2 मध्ये प्लास्टिक फ्री पॅकेजिंग दिली जाईल, जी @FSC_IC मिक्स सर्टिफाइड असेल. ह्यात 60 टक्के रीसायकल फायबरचा वापर केला जाईल. तसेच फोनमध्ये अ‍ॅल्युमिनियम फ्रेम दिली जाईल, जी 100 टक्के रिन्यूएबल एनर्जीपासून बनवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here