वनप्लसला टक्कर देण्यासाठी येणार Nothing Phone 2; फोनमधील प्रोसेसरची मिळाली माहिती

Highlights

  • Nothing Phone 2 संबंधित माहिती कार्ल पेई यांनी बार्सिलोनामधील इव्हेंटमधून दिली
  • हा फोन क्वॉलकॉमच्या फ्लॅगशिप चिपसेटसह बाजारात येईल.
  • जुन्या फोनपेक्षा हा एक प्रीमियम मॉडेल असेल.

Nothing Phone 2 बद्दल अनेक बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. कंपनी इतक्यात नवीन फोन आणणार नाही असं देखील कंपनीच्या संस्थापकांनी सांगितलं होतं. दरम्यान आता त्याच कार्ल पेईनी या Nothing Phone 2 बद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की “नथिंग फोन 2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन सीरीजवर लाँच केला जाईल आणि हा जुन्या मॉडेलपेक्षा जास्त प्रीमियम असेल.”

कार्ल पेई यांनी मात्र या फोनच्या लाँच डेटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु दिवसांपूर्वीच कंपनीच्या हवाल्याने बातमी आली होती की नथिंग फोन 2 यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत सादर केला जाईल. म्हणजे की दिवाळीच्या आसपास हा फोन येऊ शकतो. कार्ल पेई यांनी ही घोषणा बार्सिलोना मध्ये आयोजित मोबाइल वर्ल्ड काँग्रेस दरम्यान केली आहे. इथे त्यांनी नथिंग आणि क्वॉलकॉमच्या पार्टनरशिपविषयी बोलताना आपल्या नवीन फोनची माहिती दिली आहे.

Nothing Phone 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन

Nothing Phone 2 बद्दल आतापर्यंत कोणतंही मोठं लीक आलं नाही परंतु इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये तुम्हाला 12जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देखील दिली जाऊ शकते. फोनचा डिस्प्ले पाहता यात तुम्हाला अ‍ॅमोलेड पॅनल मिळू शकतो. हे देखील वाचा: WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

  • 6.55 इंचाचा 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
  • 50MP ड्युअल कॅमेरा, OIS
  • 4500mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 5 मिनिटांत बॅटरी झाली फुल! 300W Fast Charging टेक्नॉलॉजीसह Redmi नं रचला इतिहास

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here