Nothing Phone (2) भारतात 11 जुलैला होईल लाँच, पुन्हा घालणार का बाजारात धुमाकूळ?

Highlights

 • नथिंग फोन 2 11 जुलैला भारतात लाँच होईल.
 • कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे.
 • नथिंग फोन (2) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाईल.

नथिंग ब्रँडनं जेव्हा घोषणा केली की ते दुसरा स्मार्टफोन Nothing Phone (2) देखील घेऊन येत आहेत तेव्हापासून चर्चेला उधाण आलं आहे. तर आज कंपनीनं ह्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली आहे. नथिंग फोन 2 11 जुलैला भारतात लाँच होईल. फोनची लाँच डिटेल आणि लीक स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Nothing Phone (2) लाँच डिटेल

कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे की नथिंग फोन 2 येत्या 11 जुलैला भारतात लाँच होईल. हा आनलाईन इव्हेंट असेल किंवा नाही हे स्पष्ट झालं नाही परंतु कंपनीनं अशी माहिती दिली की Nothing Phone (2) लाँच इव्हेंट 11 जुलैला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा फ्लॅगशिप लाँच कंपनीद्वारे लाइव्ह प्रक्षेपित केला जाईल.

मिळेल Snapdragon 8+ Gen 1

नथिंग फोन (2) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाईल ज्याची माहिती Carl Pei ह्यांनी आधीच दिली आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 4नॅनोमीटर फॅब्रिकेशन आर्किटेक्चरवर बनला आहे जो 3.2गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. ह्यात 5जी नेटवर्कसाठी एक्स65 मॉडेम इंटिग्रेटेड आहे. Nothing Phone (1) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ चिपसेटसह आला आहे.

Nothing Phone (2) ची डिजाईन

लाँच डिटेल्स सोबतच शेयर करण्यात आलेल्या टीजर ईमेजवरून स्पष्ट झालं आहे की Nothing Phone (2) ग्लिफ लाइटिंग फीचरसह येईल त्यामुळे कॉल किंवा नोटिफिकेशन आल्यावर कलरफुल लाइट्स चमकतील. ह्या फोनचा बॅक पॅनल देखील नथिंग फोन 1 प्रमाणे ट्रान्सपरंट असेल.

फोनच्या रियर कॅमेरा सेटअपच्या चारही बाजूंनी नोटिफिकेशन लाइटचा शेप आधीपेक्षा थोडा वेगळा आहे. ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. हा फोन रीसायकेबल आणि बायो-बेस्ड प्रोडक्ट्सपासून बनवला जात आहे. ह्यातील 9 सर्किट बोर्ड्समध्ये 100 टक्के रीसायकल टीन, मेन सर्किट बोर्डवर 100 टक्के रीसायकल कॉपर फॉइल आणि 28 स्टील पोर्ट्सवर 90 टक्के रीसायकल स्टीलचा वापर केला जाईल.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

 • 6.7″ FHD+ 120Hz Display
 • 12GB RAM + 256GB Memory
 • 50MP Rear Camera
 • 16MP Selfie Camera
 • 4,700mAh Battery
 • डिस्प्ले : नथिंग फोन (2) मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकते जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. ह्यावर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो.
 • मेमरी व्हेरिएंट्स : भारतीय बाजारात नवीन नथिंग फोन 12जीबी पर्यंतच्या रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जोडीला 256जीबी स्टोरेज मिळू शकते. तसेच फोनच्या छोट्या व्हेरिएंट्समध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी मेमरी व 256जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.
 • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
 • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नथिंग फोन (2) मध्ये 4,700एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here