Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक

Highlights

  • Infinix GT 10 Pro मध्ये नथिंग फोन सारखा पारदर्शक बॅक पॅनल दिसत आहे.
  • ह्या सीरिजमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेटसह दोन फोन येतील.
  • ह्या फोन्समध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.

Infinix आता नथिंग कंपनीच्या मार्गावर चालणार असल्याचं दिसत आहे. कंपनी आता आपल्या नव्याकोऱ्या जीटी सीरिजमध्ये दोन फोन्स लाँच करणार आहे. आगामी Infinix GT 10 Pro आणि GT 10 Pro+ मध्ये नथिंग फोन सारखी डिजाईन आणि ट्रान्सपरंट बॅक पॅनल मिळू शकतो. हे फोन्स गेमिंगवर लक्ष केंद्रित करतील.

Infinix GT 10 Pro सर्वप्रथम येणार भारतात

GSMArena च्या रिपोर्टनुसार, सीरिजमधील वॅनिला मॉडेल Infinix GT 10 Pro पुढील महिन्यात सर्वप्रथम भारतात लाँच होईल. ह्यात वरच्या दर्जाचे गेमिंग फिचर परवडणाऱ्या किंमतीत दिले जातील असा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये अर्धपारदर्शक डिजाईन आणि दोन कलर ऑप्शन असलेले फोनचे फोटोज दाखवण्यात आले आहेत. परंतु इनफिनिक्स जीटी 10 प्रोमध्ये एलईडी स्ट्रिप्स दिसत नाहीत त्यामुळे बहुतेक हा नथिंग फोन प्रमाणे चमकणार नाही.

रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी सीरिजचा चिपसेट दिला जाईल. तसेच ह्यात 108 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सर आणि रिंग फ्लॅश लाइट डिजाईनसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. इनफिनिक्सनं हा फोन PUBG, MLBB आणि Free Fire सारख्या लोकप्रिय गेम्समध्ये चांगला अनुभव मिळावा ह्यासाठी ऑप्टिमाइज केला आहे. डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित एक्सओएस 13 वर चालेल ज्याला एक अँड्रॉइड अपग्रेड आणि दोन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळतील.

Infinix GT 10 Pro, GT 10 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : दोन्ही फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल.
  • चिपसेट : Infinix GT 10 Pro मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 1300 चिपसेट दिला जाईल तर GT 10 Pro+ मध्ये डायमेन्सिटी 8050 चिपसेटचा समवेश केला जाईल.
  • कॅमेरा : दोन्ही फोन्समध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • रॅम आणि स्टोरेज : GT 10 Pro मध्ये 8GB RAM/128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल तर GT 10 Pro+ सोबत 8GB/256GB स्टोरेज दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here