OnePlus 10R मिळतोय स्वस्तात; कंपनी देत आहे 10 हजार रुपयांची सूट

OnePlus 10R Discount
Highlights

  • वनप्लस 10आर वर यावेळी मोठी सूट मिळत आहे.
  • फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा
  • डिवाइस मीडियाटेक डायमेन्सिटी 8100 Max प्रोसेसरवर चालतो.

OnePlus स्मार्टफोनवर सध्या OnePlus Community Sale सुरु आहे. त्यामुळे OnePlus 10R वर मोठी सूट मिळत आहे. सेल दरम्यान मिळणार ऑफर्स जोडल्या तर ह्या फोनचा 8GB+128GB व्हेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जो 38,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. चला जाणून घेऊया सर्व ऑफर्सची माहिती.

वनप्लस कम्युनिटी सेलमध्ये OnePlus 10R वर डील

वनप्लस कम्युनिटी सेलमध्ये वनप्लस 10आर वर कंपनी 4,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर फोनच्या 8GB + 128GB आणि 12GB + 256GB व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. तसेच युजरसाठी 4,000 रुपयांचा वेगळा डिस्काउंट कुपन अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. ह्या दोन्ही ऑफर्स जोडल्या तर OnePlus 10R च्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत कमी होऊन 30,999 रुपये होते.

ICICI Bank Credit Cards कार्डनं खरेदी केल्यास 2,000 रुपयांचा आणखी डिस्काउंट मिळतो. त्यानंतर OnePlus 10R च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत कमी होऊन 28,999 रुपये होते म्हणजे तुम्ही 10,000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. OnePlus 10R चा 12GB + 256GB व्हेरिएंट तिन्ही डिस्काउंटसह 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वनप्लस कम्युनिटी सेल OnePlus Store आणि अ‍ॅमेझॉनवर लाइव्ह आहे, जो 11 जून पर्यंत चालेल.

OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : वनप्लस 10आर मध्ये 6.7-इंचाचा फ्लूइड ओएलईडी FHD+ (2412 × 1080 pixel) डिस्प्ले आहे. हा 120Hz रिफ्रेश रेट (adaptive), 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 950 निट्स पीक ब्राइटनेस, HDR10+ आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो.
  • प्रोसेसर-मेमरी : फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8100 Max प्रोसेसरसह Mali G610 जीपीयू आहे. फोन 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटसह येतो.
  • ओएस : फोन अँड्रॉइड 13 वर चालतो, जो Android 14 सह अपग्रेड केला जाऊ शकतो.
  • कॅमेरा : फोनच्या रियर पॅनलवर 50MP चा प्रायमरी, 8MP अल्ट्रा वाइड अँगल, 2MP मायक्रो लेन्स आहे, तसेच फ्रंटला 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी आणि चार्जिंग : फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W SuperVOOC चार्जिंग आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसह येते.
  • कनेक्टिव्हिटी : हा फोन ड्युअल-सिम, 5G, Wi-Fi 6 802.11 ax, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएसला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here