लाँचपूर्वीच लीक झाले OnePlus 11 चे फोटो; पुढील आठवड्यात येऊ शकतो हा अँड्रॉइड फोन

विवो, शाओमी, मोटोरोला सारख्या कंपन्यांनी आपले यंदाचे फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये सादर केले आहेत. आता टेक प्रेमी वनप्लसच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनची वाट बघत आहेत. बहुप्रतीक्षित OnePlus 11 स्मार्टफोन चीनमध्ये आठवड्यात 4 जानेवारी 2023 ला लाँच केला जाईल. तर भारतीय लाँचसाठी आपल्याला 7 फेब्रुवारीची वाट पाहावी लागेल. अलीकडेच आलेल्या लिक्समधून या स्मार्टफोनच्या किंमतीसह सर्व माहिती मिळाली आहे. तर आता 91mobiles कडे OnePlus 11 चे एक्सक्लुसिव्ह फोटो आले आहेत.

इंडस्ट्री सोर्सकडून मिळालेल्या या फोटोजमधून पहिल्यांदाच OnePlus 11 चा फ्रंट पॅनल इतका स्पष्ट दिसला आहे. OnePlus 11 मध्ये फ्रंटला फ्लॅट एज डिजाईन देण्यात येईल तर डावीकडे असलेल्या पंच होलमध्ये सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या उजव्या पॅनलवर अलर्ट स्लायडर आणि पावर बटन दिसत आहे, तर डावीकडे व्हॉल्युम रॉकर आहे. फोनच्या मागे चांगल्या ग्रीपसाठी सँडस्टोन फिनिश दिली जाऊ शकते. बॅक पॅनलवर वरच्या बाजूला उजवीकडे वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल, ज्याला ग्लॉसी फिनिश मिळू शकते. या मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह येऊ शकतो.

OnePlus 11 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ QHD+ AMOLED डिस्प्ले
  • 16GB RAM आणि 512GB स्टोरेज
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 50MP + 48MP + 32MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 100W फास्ट चार्जिंग

सर्टिफिकेशन्स साइट टेना नुसार वनप्लस 11 5जी फोन 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार ही फोन स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. सर्टिफिकेशनमध्ये फोनचे डायमेंशन 163.1 x 74.1 x 8.53एमएम आणि वजन 205ग्राम असे लिस्ट करण्यात आले आहेत. या फोनमध्ये अलर्ट स्लाईडर देखील दिला जाऊ शकतो.

OnePlus 11 5G फोन टेनानुसार अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर चालू शकतो. अन्य लीक्समध्ये या फोनमध्ये ऑक्सीजनओएस असल्याचं सांगण्यात आलं आहे. टेना नुसार हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच होऊ शकतो. सर्टिफिकेशनमधून या फोनचे 12जीबी रॅम आणि 16जीबी रॅम व्हेरिएंट समोर आले आहेत ज्यात 256 जीबी स्टोरेज आणि 512जीबी स्टोरेज मिळू शकते.

वनप्लस 11 5जी फोन Hasselblad लेन्ससह बाजारात येऊ शकतो. टेना सर्टिफिकेशन नुसार स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 2एक्स ऑप्टिकल झूम असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 48 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स असू शकते. तर OnePlus 11 5G 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो.

फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपमधील या लेन्स 50MP Sony IMX890 सेन्सर, 48MP IMX581 सेन्सर आणि 32MP IMX709 सेन्सर असू शकतात, अशी माहिती आधी आली होती. टेना सर्टिफिकेशन पाहता हा वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच ड्युअल-सेल बॅटरीसह येऊ शकतो ज्यात सिंगल-सेल व्हॅल्यू 2,435एमएएच असू शकते. तसेच लिस्टिंगमध्ये OnePlus 11 5G स्मार्टफोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here