OnePlus 12 च्या डिजाईनचा खुलासा; लाँच होण्याआधीच फोटोज आले समोर

Highlights

  • OnePlus 12 ची डिजाइन जुन्या OnePlus 11 सारखीच दिसत आहे.
  • फोनमध्ये यावेळी पेरीस्कोप कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • कंपनी यावेळी फॉक्स लेदर मटेरियलचा वापर बॅक पॅनलवर करू शकते.

नॉर्ड सीरिजमध्ये जरी अनेक फोन्स येत असले तरी वनप्लसच्या नंबर सीरिजमधील मॉडेल्सची संख्या मर्यादित आहे. यंदा OnePlus 11 लाँच केल्यानंतर आता कंपनीनं OnePlus 12 ची तयारी सुरु केली आहे. कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप डिवाइसचे काही लीक फोटोज ऑनलाइन समोर आले आहेत. ज्यातून फोनचा कॅमेरा आणि डिजाइन पाहता येईल. पुढे आम्ही ह्या डिवाइसची संपूर्ण माहिती दिली आहे.

OnePlus 12 चे लीक फोटो

टेक वेबसाइट स्मार्टप्रिक्स आणि प्रमुख टिप्सटर ऑनलिक्स यांनी मिळून OnePlus 12 चे चार फोटोज लीक केले आहेत, ज्यातून फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे.

  • फोटोजनुसार, मागील पॅनलवर मोठा कॅमेरा ब्रॅकेट आहे जो बॅक पॅनलपासून पुढील फ्रेम पर्यंत येत आहे.
  • OnePlus 11 च्या डिजाईन प्रमाणे ह्यात देखील एक गोल कॅमेरा मॉड्यूल आहे.
  • फक्त यावेळी डिवाइसमध्ये पेरिस्कोप लेन्स दिसत आहे. त्यामुळे वनप्लस 12 मध्ये हाय रेंज डिजिटल झूम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.
  • कलर ऑप्शन पाहता फोन ब्लॅक कलरमध्ये समोर आला आहे जोडीला बॅक पॅनलवर फॉक्स लेदर डिजाइन दिसत आहे.
  • फोनच्या फ्रंटला बेजल लेस डिस्प्ले आहे जिथे सेंटरला पंच होलमध्ये कॅमेरा देण्यात आला आहे.
  • वरच्या बाजूला ईयरपीस दिसत आहे.
  • उजवीकडे अलर्ट स्लाइडर, पावर बटनसह वॉल्यूम अप-डाउन बटन आहे.

वनप्लस 12 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: ह्यात 6.7 इंचाचा OLED QHD+ डिस्प्ले मिळेल, असं सांगण्यात आलं आहे. ह्या डिस्प्लेवर 120Hz चा रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: दमदार परफॉर्मन्ससाठी डिवाइसमध्ये ऑक्टोबरमध्ये लाँच होणारा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो.
  • स्टोरेज: फोनमध्ये 16 जीबी पर्यंत रॅम +512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा: ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 64 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स असू शकते.
  • बॅटरी: फोन 5000mAh बॅटरी आणि 100 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच केला जाऊ शकतो.
  • अन्य: डिवाइसमध्ये ब्लूटूथ, वायफाय, ड्युअल सिम 5Gला सपोर्ट सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात.
  • OS: हा डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइडसह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here