पेट्रोलविना चालणारी दणकट बाइक आली बाजारात; इतकी आहे PURE EV ecoDryft ची किंमत

Highlights

  • 99,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत PURE EV ecoDryft इलेक्ट्रिक बाइक लाँच
  • फुल चार्जमध्ये 135KM रेंज देते PURE EV ecoDryft ई-बाइक
  • PURE EV ecoDryft ई-बाइकचा टॉप स्पीड आहे ताशी 75KM आहे.

PURE EV ecoDryft e-motorcycle: भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी PURE EV नं काही दिवसांपूर्वी आपली नवीन electric bike भारतात सादर केली होती. या बाइकला कंपनीनं EcoDryft असं नाव दिलं होतं, जी सिंगल चार्जवर 135km ची रेंज देते, असा दावा कंपनीनं केला आहे. अशा या दमदार बाइकच्या किंमतीचा खुलासा मात्र कंपनीनं केला नव्हता, जो आता करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया PURE EV ecoDryft ची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स.

Electric Motorcycle EcoDryft Price

हैद्राबादमधील इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता प्योर ईव्ही (PURE EV) नं भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केली आहे. कंपनीनं PURE EV EcoDryft च्या किंमतीचा खुलासा केला आहे. याची प्रारंभिक किंमत 99,999 रुपये एक्स-शोरूम दिल्ली (राज्य सरकारच्या सब्सिडीसह) आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकल बद्दल कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यावर ही 135 KM ची रायडिंग रेंज देते. हे देखील वाचा: Nothing Phone (2) येतोय! सीईओनी दिली माहिती; यावेळी भिडणार आयफोनशी?

प्योर ईव्हीचे को-फाउंडर आणि सीईओ रोहित वडेरा यांनी म्हटलं की गेल्या दोन महिन्यांत आम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी संपूर्ण भारतात आमच्या 100+ डीलरशिपवर डेमो वाहने दिली आणि आम्हाला ग्राहकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आमच्या सर्व डीलरशिपवर ईकोड्राइफ्टसाठी बुकिंग आता सुरु करण्यात आली आहे. या बाइकची डिलिव्हरी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होईल.

PURE EV ecoDryft ची डिजाइन

PURE EV च्या या इलेक्ट्रिक बाइकची डिजाइन पाहता, EcoDryft बेसिक कम्यूटर मोटरसायकल सारखी दिसते. यात अँगुलर हेडलॅम्प, फाइव-स्पोक अलॉय व्हील, सिंगल-पीस सीट इत्यादी देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड अशा चार कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: वर्षाला 13 रिचार्ज करण्याची गरज नाही! 30 दिवस पुरतील जियोचे ‘हे’ प्लॅन, किंमत 181 पासून सुरु

PURE EV ecoDryft ची रेंज

PURE EV नुसार, ecoDryft इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 3.0 kWh बॅटरी पॅक आहे, जो AIS 156 सर्टिफाइड आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्ज केल्यावर ही बाइक 135 km ची राइडिंग रेंज देऊ शकते. अद्याप यातील इलेक्ट्रिक मोटरचे स्पेसिफिकेशन समोर आले नाहीत. परंतु दावा केला जात आहे की या बाइकचा टॉप स्पीड ताशी 75 km आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here