अशी असेल OnePlus Nord 3 ची डिजाईन, लाँचपूर्वीच लीक झाली फोनची ऑफिशियल ईमेज

Highlights

  • फोटो चीनमधून लीक झाले आहेत.
  • फोन दोन रंगात समोर आला आहे.
  • ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल.

OnePlus Nord 3 ची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनी अजूनही ह्या फोनबद्दल कोणतीही माहिती नाही परंतु लीक्समधून फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती येत आहे. आता वनप्लस नॉर्ड 3 चे ऑफिशियल फोटोज देखील लीक झाले आहेत, ज्यातून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

वनप्लस नॉर्ड 3 5जी चा लुक आणि डिजाईन (लीक फोटो)

  • Punch-Hole Screen
  • Bezel-less Design
  • Dual LED Flesh
  • Alert Slider
  • Black/Green Colors
  • फ्रंट पॅनल : वनप्लस नॉर्ड 3 पंच-होल डिस्प्लेसह दाखवण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या वरच्या मध्यभागी असलेल्या पंचहोलमध्ये दिला जाईल. हा डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस आहेत ज्याच्या चारही बाजूंना बारीक एज दिसत आहेत.
  • बॅक पॅनल : फोटोजमध्ये हा वनप्लस फोन मॅट फिनिश असलेला दिसत आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप डावीकडे आहे. ज्यात दोन मोठे रिंग देण्यात आले आहेत यातील एका रिंगमध्ये सिंगल सेन्सर तर दुसऱ्या रिंगमध्ये दोन सेन्सर आहेत. ह्या दोन्ही कॅमेरा रिंगच्या बाजुकला एक-एक एलईडी फ्लॅश आहे. पॅनल पूर्णपणे सपाट आहे तर मध्यभागी मध्ये OnePlus चा लोगो देण्यात आला आहे.
  • साइड पॅनल : OnePlus Nord 3 च्या टॉप एजवर मायक्रोफोनसह स्पिकर आणि आयआर ब्लास्टर देखील दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबतच सिम स्लॉट आणि स्पिकर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आहे तर डाव्या पॅनलवर पावर बटन आहे. विशेष म्हणजे अलर्ट स्लाइडरही दिसत आहे.

वनप्लस नॉर्ड 3 5जी स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.74″ 1.5K AMOLED
  • 80W 5,000mAh battery
  • 16GB RAM+512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Rear+16MP selfie Camera
  • प्रोसेसर : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 सह लाँच होऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • व्हेरिएंट्स : लीकनुसार OnePlus Nord 3 5G दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. ज्यात 12जीबी रॅम तसेच 16जीबी रॅमचा समावेश असू शकतो. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • स्क्रीन : नॉर्ड 3 5जी फोन 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार, ह्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर असेल जोडीला 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेन्सरसह चालेल. तसेच नॉर्ड 3 5जीच्या फ्रंट पॅनलवर 16एमपी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : लीकनुसार वनप्लस नॉर्ड 3 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here