OnePlus Nord 3 ची किंमत, रॅम आणि स्टोरेज लीक; लाँचपूर्वीच जाणून घ्या माहिती

Highlights

  • बेस मॉडेल 35,000 रुपयांमध्ये येऊ शकतो.
  • ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसर असू शकतो.
  • फोनमध्ये 16GB रॅम +256GB स्टोरेज मिळू शकते.

OnePlus Nord 3 स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारासह भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो. नवीन मोबाइल फोन ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. कंपनीनं सध्या ह्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही, परंतु सतत लीक समोर येत आहेत. आता एका ताज्या लीकमध्ये टिपस्टरनं फोनच्या स्टोरेज ऑप्शन आणि किंमतीची माहिती दिली आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord 3 प्राइस लीक

OnePlus Nord 3 संबंधित नवीन माहिती टिपस्टर Roland Quandt नं माहिती दिली आहे ज्यातून फोनची युरोपियन प्राइस आणि मेमरी ऑप्शन समोर आले आहेत. लीकनुसार नॉर्ड 3 च्या 8GB रॅम +128GB स्टोरेज बेस मॉडेलची किंमत 449 यूरो म्हणजे 39,900 रुपये असू शकते. तसेच 16GB रॅम +256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 549 यूरो म्हणजे 48,800 रुपये असू शकते. हा डिवाइस ग्रीन आणि ग्रे सारख्या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो.

कमी असू शकते भारतीय किंमत

भारतीय किंमत पाहता OnePlus Nord 3 ची किंमत थोडी आणखी कमी असू शकते. भारतात फोनचा बेस मॉडेल 35,000 आणि टॉप व्हेरिएंट 40,000 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. स्टोरेज आणि किंमत लीक होण्यापूर्वी मोबाइलचे डिजाइन रेंडर्स देखील समोर आले आहेत. ज्यातून स्पष्ट झालं आहे की डिवाइस OnePlus Ace 2V च्या का रीबॅज व्हर्जन असेल. जो चीनमध्ये यावर्षीच लाँच करण्यात आला होता.

OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : OnePlus Nord 3 चे लीक स्पेसिफिकेशन पाहता ह्यात 6.74 इंचाचा 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 2772 x 1240 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.
  • प्रोसेसर : कंपनी डिवाइसमध्ये दमदार मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसर वापर करेल.
  • स्टोरेज : स्टोरेज ऑप्शन पाहता ह्याआधी समोर आलं आहे की फोन 8GB रॅम +256GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात सादर केला जाईल.
  • बॅटरी : बॅटरी पाहता स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळण्याची शक्यता कमी आहे.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स दिली जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
  • अन्य : फोनमध्ये सुरक्षेसाठी अलर्ट स्लाइडर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5G सपोर्ट आयआर ब्लास्टर सारखे फीचर्स मिळतील.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजन OS 13 वर चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here