OnePlus Nord 4 चे पावरफुल स्पेसिफिकेशन आले समोर, गीकबेंचवर झाला स्पॉट

वनप्लस लवकरच Nord सीरिजचा विस्तार करणार आहेत. यानुसार कंपनी नवीन मोबाईल OnePlus Nord 4 जागतिक आणि भारतीय बाजारात सादर करू शकते. हा सध्या बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंच, यूरोफिन्स आणि कॅमेरा FV5 डेटाबेसवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह दिसला आहे. चला, पुढे लिस्टिंगची माहिती जाणून घेऊया.

OnePlus Nord 4 गीकबेंच लिस्टिंग

  • वनप्लसचा नवीन डिव्हाईस CPH2621 मॉडेल नंबरसह गीकबेंच प्लॅटफॉर्मवर स्पॉट करण्यात आला आहे. ज्याला आगामी वनप्लस नॉर्ड 4 स्मार्टफोन मानले जात आहे.
  • गीकबेंचवर डिव्हाईसने सिंगल-कोर टेस्टमध्ये 1875 अंक आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 4934 अंक मिळवले आहेत.
  • फोन ‘pineapple’ कोडनेम चिपसेटसह दिसला आहे. हा ऑक्टा-कोर क्वॉलकॉम चिपसेट आणि एड्रेनो 732 जीपीयू सह जोडला आहे.
  • वरती दिलेल्या कोडनेम आणि GPU नुसार वनप्लसच्या नवीन फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेट लावला जाऊ शकतो.
  • लिस्टिंगमध्ये हे पण सांगण्यात आले आहे की या चिपसेटसह 12GB पर्यंत रॅमची पावर मिळू शकते.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारित ऑक्सिजन ओएस 14 वर काम करू शकतो.

OnePlus Nord 4 यूरोफिन्स लिस्टिंग

  • यूरोफिन्स सर्टिफिकेशनवरून असे समजले आहे की वनप्लस स्मार्टफोनला 5430mAh-रेटेड बॅटरीसह ठेवले जाऊ शकते. लाँचच्या वेळी यात 5,500mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
  • यूरोफिन्स लिस्टिंगमध्ये डिव्हाईस यूएसबी टाइप सी पोर्ट आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह दिसला आहे.

OnePlus Nord 4 कॅमेरा एफवी 5 लिस्टिंग

  • कॅमेरा FV 5 डेटाबेसवर नवीन वनप्लस फोन ऑप्टिकल फोटो स्टेबिलायजेशन (OIS), f/1.9 अपर्चर आणि 26.4mm फोकल लेंथ प्रायमरी कॅमेरा असलेला सांगण्यात आले आहे.
  • डिव्हाईसमध्ये f/2.4 अपर्चर, EIS आणि 25.2mm फोकल लेंथ असलेला सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

शेवटी तुम्हाला सांगतो की OnePlus Nord 4 डिव्हाईस चीनमध्ये सादर केलेल्या OnePlus Ace 3V चा रिब्रँड व्हर्जन सांगितले आहे जो भारतासह इतर जागतिक मार्केटमध्ये लवकर लाँच होऊ शकतो. आता पाहायचे की ब्रँडकडून कोणती घोषणा समोर येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here