OnePlus Nord N30 5G फोन 108MP Camera सह लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 3 Lite
Highlights

 • फोन अमेरिकेत लाँच झाला आहे.
 • हा रीब्रँडेड Nord CE 3 Lite आहे.
 • नॉर्ड सीई 3 लाइट इंडिया प्राइस ₹19,999 आहे.

वनप्लसनं जागतिक बाजारात आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत अजून एक नवीन मोबाइल OnePlus Nord N30 5G लाँच केला आहे. हा डिवायस अमेरिकन बाजारात आला आहे जो मिड-बजेट सेग्मेंटमध्ये दाखल झाला आहे. ह्या नॉर्ड एन30 5जी चा लुक आणि स्पेसिफिकेशन्स भारतातील OnePlus Nord CE 3 Lite सारखे आहेत, ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord N30 5G ची किंमत

नॉर्ड एन30 5जी फोन अमेरिकन मार्केटमध्ये सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे जो 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्या फोनची किंमत $299.99 आहे जी भारतीय करंसीनुसार 24,800 रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे भारतात नॉर्ड सीई 3 लाइट 5जी 19,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

OnePlus Nord CE 3 Lite

OnePlus Nord N30 5G स्पेसिफिकेशन्स

 • 6.72″ FHD+ 120Hz display
 • Qualcomm Snapdragon 695
 • 8GB Virtual RAM
 • 108MP Rear Camera
 • 67W 5,000mAh Battery
 • स्क्रीन : वनप्लस नॉर्ड एन30 5जी फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
 • प्रोसेसर : हा फोन 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच झाला आहे. नॉर्ड एन30 5जी मध्ये 8जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आला आहे जो इंटरनल 8जीबी फिजिकल रॅमसह 16जीबी रॅम पर्यंतची ताकद देतो.
 • कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल सॅमसंग एचएम6 सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह चालतो. तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
 • बॅटरी : OnePlus Nord N30 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनला 67वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
 • कनेक्टिव्हिटी : ह्या फोनमध्ये ड्युअल सिम 5G सह WiFi, Bluetooth 5.3, USB-C port, आणि 3.5mm headphone jack सारखे फीचर्स मिळतात.
 • सेन्सर : सिक्योरिटीसाठी ह्या फोनच्या साइड पॅनलवर फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे जो पवार बटनवर इम्बेड आहे. तसेच हा वनप्लस मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here