OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर

Highlights

  • OPPO A2 स्मार्टफोन 5G सपोर्ट मिळू शकतो.
  • डिवाइसमध्ये 4870mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
  • 6.7 इंचाचा OLED कर्व डिस्प्ले मिळू शकतो.

ओप्पो आपल्या ए-सीरीजमध्ये OPPO A2 स्मार्टफोन लाँच करू शकते. हा डिवाइस चीनच्या TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. त्याचबरोबर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं ह्याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती देखील दिली आहे. चला जाणून घेऊया ह्या लिस्टिंगची माहिती आणि मोबाइलचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील ते.

OPPO A2 TENAA लिस्टिंग आणि लीक

  • ओप्पोचा जो डिवाइस लिस्टिंगमध्ये समोर आला आहे त्याचा मॉडेल नंबर PJG110 आहे. जो ओप्पो A2 असल्याचं म्हटलं जात आहे. लिस्टिंगमध्ये स्पेसिफिकेशनसह इमेज देखील आहे.
  • लिस्टिंगनुसार ओप्पोचा नवीन डिवाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ज्यात एलईडी फ्लॅश देखील आहे.
  • असं देखील समोर आलं आहे की डिवाइसमध्ये 4870mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
  • डिवाइसची इमेज पाहता ह्यात बॅक पॅनलवर वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आहे.
  • समोर पंच होल कटआउट डिजाइन दिसते. तर उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन आहे.
  • टिप्स्टरनुसार फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED फुल एचडी प्लस कर्व डिस्प्ले मिळू शकतो.
  • ह्यात डिस्प्लेवर 1080 x 2412 चं पिक्सल रिजॉल्यूशन, 2160Hz PWM डिमिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

OPPO A2 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : डिवाइसचे संभाव्य स्पेसिफिकेशन पाहता, ह्यात 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकतो.
  • चिपसेट : फोनमध्ये कंपनी दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • मेमोरी : डिवाइसमध्ये 12जीबी पर्यंत रॅम + 256जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. परंतु ह्यातील कॅमेरा सेन्सरची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही.
  • बॅटरी : स्मार्टफोन लिस्टिंगनुसार 4870 एमएएचची बॅटरी मिळेल. जोडीला फास्ट चार्जिंग सपोर्टची शक्यता आहे.
  • OS : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमसह येऊ शकतो.
  • अन्य : फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम 5G सपोर्ट सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here