OPPO A58 4G लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन आली समोर

Highlights

  • मोबाइल लवकरच भारतीयांच्या भेटीला
  • कमी किंमतीत 5000mAh बॅटरी आणि 33W चार्जिंग दिली जाऊ शकते.
  • डिवाइस 8GB रॅम+256GB स्टोरेजसह येऊ शकतो.

मोबाइल निर्माता ओप्पो आपल्या ए सीरीजमध्ये लवकरच आणखी एक स्मार्टफोन जोडू शकते. बातमीनुसार OPPO A58 4G स्मार्टफोन काही दिवसांत भारतासह जागतिक बाजारात लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे 4G मॉडेल असल्यामुळे ह्या ओप्पो मोबाइलची किंमत लोव्हर मिड बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. पुढे डिवाइसच्या संभाव्य स्पेसिफिकेशन, डिजाइन आणि फीचर्सची माहिती देण्यात आली आहे.

OPPO A58 4G ची संभाव्य डिजाइन

91मोबाइल्सनं दिलेल्या माहितीनुसार ओप्पो ए58 4जी फोनच्या बॅक पॅनलवर लांबट कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो ज्यात एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरा कटआउट दिले जातील. फ्रंटला डिवाइसमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा मोबाइल ब्लॅक आणि ब्लूसह मिक्स शाइन कलरमध्ये येऊ शकतो.

OPPO A58 4G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

हा डिवाइस एफसीसी, बीआईएस, एनबीटीसी सारख्या काही सर्टिफिकेशन वेबसाइटवर समोर आला आहे. तुम्ही खाली सर्टिफिकेशन आणि संभाव्य स्पेसिफिकेशनची माहिती पाहू शकता.

  • डिस्प्ले : OPPO A58 4G मध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात 1612 × 720 पिक्सल रिजॉल्यूशन, 90hz रिफ्रेश रेट, 96% एनटीएससी 100% DCI-P3 3 कलर गमट सपोर्ट मिळू शकतो.
  • स्टोरेज : डिवाइस 8GB LPDDR4X रॅम +256GB इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चा वापर करू शकते. जो 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 जीपीयू मिळू शकतो.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्ट्रेट लेन्स दिली जाऊ शकते. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी : एफसीसी लिस्टिंगमधून समजलं आहे की डिवाइस 5000mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC चार्जिंगसह येऊ शकतो.
  • ओएस : एफसीसी लिस्टिंगनुसार डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित ColorOS 13.1 वर चालेल.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल सिम 4G, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस सारखे बेसिक फीचर्स दिले जातील.
  • वजन आणि डायमेंशन : लिस्टिंगनुसार फोनचे डायमेंशन 165.60×75.98×7.99mm आणि वजन 188 ग्राम असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here