OPPO A73 5G ची संपूर्ण माहिती आली समोर, लॉन्चच्या आधी बघा डिजाईन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO ने काही दिवसांपूर्वीच ग्लोबल टेक मंचावर आपला नवीन स्मार्टफोन OPPO A73 सादर केला आहे. हा फोन ट्यूनेशिया मध्ये लॉन्च केला गेला आहे जो इंडियन मार्केट मधील Oppo F17 चा रि-ब्रँडिड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. ओपो ए73 लॉन्च केल्यानंतर आता ओपोची नजर या फोनचा पावरफुल वर्जन बाजारात आणण्यावर आहे. ओपो ए73 एक 4जी फोन होता, तर कंपनी आता नवीन OPPO A73 5G स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. या फोनच्या अधिकृत घोषणेच्या आधीच 91मोबाईल्सला या फोनची रेंडर ईमेज आणि स्पेसिफिकेशन्स मिळाले आहेत.

91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार OPPO A73 5G लवकरच टेक मार्केट मध्ये येईल. मिळालेल्या फोटोजवरून खुलासा झाला आहे कि हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च होईल आणि सेल्फी कॅमेऱ्यासह येईल, हा होल स्क्रीनच्या वरच्या भागात डावीकडे देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण मिळू शकतो.

OPPO A73 5G ची रियर डिजाईन फोनच्या 4जी मॉडेल ओपो ए73 सारखी आहे. डिवाईसव्हा वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यावर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर्स सह एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वरून फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे तसेच खळॆ उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये OPPO ची ब्रँडिंग देण्यात आली आहे. उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि डाव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

OPPO A73 5G

ओपो ए73 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता मिळालेल्या माहिती नुसार हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालेल. या फोनचे डायमेंशन 161 x 75 x 7.9एमएम आणि वजन 177ग्राम असल्याची माहिती समोर आली आहे.

OPPO A73 5G अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा डायमनसिटी 720 चिपसेट मिळू शकतो. रिपोर्टनुसार ओपो ए73 5जी फोनचा एकच वेरिएंट समोर आला आहे ज्यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

फोटोग्राफीसाठी OPPO A73 5G च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 119डिग्री FOV क्षमता असलेली व एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर असल्याचा खुलासा झाला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

OPPO A73 5G डुअल सिम फोन असल्याचे बोलले जात आहे ज्यात 5जी सोबतच 4जी वोएलटीईला सपोर्ट पण मिळेल. 3.5एमएम जॅक व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल तसेच फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण असेल. पावर बॅकअपसाठी ओपो ए73 5जी मध्ये 18वॉट VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,040एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here