अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2023 : बेस्ट लॅपटॉप डील्स

अ‍ॅमेझॉनवर ग्रेट समर सेल लाइव्ह झाला आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही देखील तुमचा जुना लॅपटॉप अपग्रेड करू इच्छित असाल किंवा नवीन लॅपटॉप खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर ही योग्य वेळ आहे. सेल दरम्यान स्वस्तात लॅपटॉप विकत घेता येईल. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेल दरम्यान Asus, Dell, HP, Acer सारख्या कंपन्या आपल्या प्रोडक्टवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहेत. आज आम्ही तुम्हाला इथे अ‍ॅमेझॉनवर मिळणाऱ्या बेस्ट लॅपटॉप डील्सची माहिती देत आहोत.

ASUS TUF Gaming A15

जर तुम्ही कमी किंमतीत गेमिंग स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ASUS TUF Gaming A15 तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. आसुसच्या या गेमिंग लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5 4600H CPU देण्यात आला आहे जो Nvidia GeForce GTX 1650 GPU सह येतो. आसुसचा हा लॅपटॉप 512GB SSD स्टोरेज आणि अ‍ॅडिशनल फीचर्ससह येतो. तसेच कंपनी एक महिन्याचं Xbox Game Pass सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

  • प्राइस : 71,990 रुपये
  • डील प्राइस : 48,489 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HP Omen 16

HP चा Omen रेंज लॅपटॉपमध्ये शानदार 16.1-इंचाचा लॅपटॉप मिळतो, जो AMD Ryzen 7 6800H प्रोसेसरसह येतो. एचपीचा हा लॅपटॉप QHD रिजोल्यूशन 2,560 x 1,440 पिक्सल आणि 165Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेसह येतो. HP Omen 16 लॅपटॉपमध्ये 16GB रॅम देण्यात आला आहे, जो 32GB पर्यंत वाढवता येतो. तसेच हा 1TB SSD सह येतो. हा लॅपटॉप Nvidia GeForce RTX 3070 Ti GPU सह येतो.

  • प्राइस : 1,26,641 रुपये
  • डील प्राइस : 1,12,989 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Acer Aspire 5

अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान Acer देखील जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. एसरच्या या लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel Core i5-1240P प्रोसेसर देण्यात आला आहे, जोडीला Nvidia GeForce RTX 2050 GPU मिळतो. हा लॅपटॉप ड्युअल फॅन डिजाइनसह सादर करण्यात आला होता जो हाय एन्ड कूलिंग सोल्युशनसह येतो. जोडीला लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो FHD रिजोल्यूशन असलेला पॅनल आहे. हा लॅपटॉप मेटल डिजाइनसह येतो ज्यात इलेवेटिंग हिंज डिजाइन आणि एर्गोनॉमिक फीचर देण्यात आले आहेत.

  • प्राइस : 82,999 रुपये
  • डील प्राइस : 57,489 रुपये (बँक ऑफर्ससह)

HP Victus (15.6-inch)

HP Victus बजेट गेमिंग लॅपटॉप आहे जो दमदार स्पेसिफिकेशन्ससह येतो. एचपीच्या या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5 5600H प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यात ग्राफिक्स सपोर्टसाठी AMD Radeon RX 6500M GPU देण्यात आला आहे. तसेच लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. हा लॅपटॉप ड्युअल स्पिकर सपोर्टसह येतो, जो शानदार ऑडियो एक्सपीरियंस देतो.

  • प्राइस : 77,354 रुपये
  • डील प्राइस : 52,989 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HP Victus (16.1-inch)

HP Victus च्या अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल. एचपीचा हा लॅपटॉप 16.1-इंच FHD पॅनलसह येतो. या गेमिंग लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5 5600H प्रोसेसर आणि AMD Radeon RX 5500M ग्राफिक्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर लॅपटॉपमध्ये 512GB एक्सपांडेबल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच मर्यादित कालावधीसाठी Xbox Game Pass देखील दिला जात आहे.

  • प्राइस : 71,343 रुपये
  • डील प्राइस : 52,489 रुपये (बँक डिस्काउंट)

    Dell Gaming G15 5525

    जर तुम्ही गेमिंगसह प्रोफेशनल लॅपटॉप शोधत असाल तर Dell ची ही मशीन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. डेलच्या या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5 6600H सीपीयू देण्यात आला आहे, जो 8GB रॅम आणि 512GB एसएसडीसह येतो. या लॅपटॉप सह McAfee अँटीव्हायरसचं 15 महिन्याचं सब्सक्रिप्शन मिळतं. तसेच गेमिंग आणि हाय क्वॉलिटी ग्राफिक्स ड्यूटीसाठी Nvidia GeForce RTX 3050 GPU देण्यात आला आहे.

    • प्राइस : 1,01,448 रुपये
    • डील प्राइस : 62,989 रुपये (बँक डिस्काउंटसह)

    HP Victus (Ryzen 7)

    HP Victus अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये जबरदस्त डिस्काउंटसह मिळत आहे. एचपीचा हा लॅपटॉप AMD Ryzen 7 5800H प्रोसेसरसह येतो. या लॅपटॉपमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला 16.1-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. जोडीला ग्राफिक्ससाठी यात Nvidia GeForce RTX 3050 GPU आणि 512GB एसएसडीचा सपोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये Microsoft Office 2021 प्री इंस्टॉल मिळतं. तसेच एक महिन्याचा Xbox Game Pass मिळतो.

    • प्राइस : 92,395 रुपये
    • डील प्राइस : 66,489 रुपये (बँक डिस्काउंटसह)

    ASUS TUF Gaming F15 (2021)

    ASUS चा दमदार बजेट गेमिंग लॅपटॉप TUF Gaming F15 (2021) अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. या लॅपटॉपमध्ये 10th Gen Intel Core i5-10300H प्रोसेसर मिळतो. त्याचबरोबर यात 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते. तसेच ग्राफिक्ससाठी Nvidia GeForce GTX 1650 GPU देण्यात आला आहे. डिस्प्ले पाहता यात 144Hz चा 15.6-इंच FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. आसुसची ही गेमिंग मशीन RGB-बॅकलिट की-बोर्ड आणि एक महिलांच्या Xbox Game Pass सब्सक्रिप्शनसह येते.

    • प्राइस : 74,990 रुपये
    • डील प्राइस : 51,489 रुपये (बँक डिस्काउंट आणि कुपनसह)

    ASUS TUF Gaming A15 (2022)

    ASUS TUF Gaming A15 (2022) मध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले मिळतो. प्रोसेसर पाहता आसुसचा हा लॅपटॉप हाई-एन्ड AMD Ryzen 7 6800H प्रोसेसरसह येतो, ज्यात Nvidia RTX 3050 GPU देण्यात आला आहे. तसेच लॅपटॉपमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. ASUS चा हा गेमिंग लॅपटॉप मेटल बॉडीसह सादर करण्यात आला आहे.

    • प्राइस : 1,41,990 रुपये
    • डील प्राइस : 80,489 रुपये (बँक डिस्काउंटसह)

    HP Victus (Intel Core i5)

    HP Victus चा इंटेल व्हेरिएंट अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान कमी किंमतीत विकत घेता येईल. एचपी विक्टसचा हा गेमिंग लॅपटॉप 12th Gen Intel Core i5-12450H प्रोसेसरसह येतो. या लॅपटॉपमध्ये 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते. एचपीच्या या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. तसेच ग्राफिक्ससाठी यात Nvidia GeForce RTX 3050 जीपीयूचा सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर एक महिन्याचं Xbox Game Pass सब्सक्रिप्शन मिळतं.

    • प्राइस : 86,343 रुपये
    • डील प्राइस : 68,989 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here