OPPO ने सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘एफ सीरीज’ मध्ये OPPO F17 Pro लॉन्च केला होता. लॉन्च नंतर तीन महिन्यांनी कंपनीने हा आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. जर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करत असाल तर आता ओपो एफ17 प्रो कमी किंमतीत ऑनलाइन व ऑफलाइन विकत घेता येईल. 91मोबाईल्सला फोनची किंमत कमी झाल्याची माहिती एक्सक्लूसिवली आमच्या ऑफलाइन सोर्सकडून मिळाली आहे. चला जाणून घेऊया फोनची नवीन किंमत आणि याच्या शानदार फीचर्स बाबत सर्वकाही.
नवीन किंमत
Oppo F17 Pro च्या किंमतीत 1500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. स्मार्टफोन याआधी 22,990 रुपयांमध्ये विकला जात होता. पण, आता हा डिवाइस 21,490 रुपयांमध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन विकत घेता येईल. नवीन किंमतीसह फोन अमेझॉन इंडिया वर पण विकला जात आहे. कंपनीने फोनच्या किंमतीत कायमची कपात केली आहे.
हे देखील वाचा : 8GB रॅम असलेला Vivo Y51 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत व सर्व फीचर्स
Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स
OPPO F17 Pro कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी शानदार विजुअल क्वॉलिटी देते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 टक्के आहे.
OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. ओपो फोनचा सेल्फी कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर सह येतो, जो आब्जेक्ट रंगीत ठेऊन बॅकग्रांउड ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो.
OPPO F17 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली 2एमपी मोनो लेंस देण्यात आली आहे.
ओपो एफ17 प्रो एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो एफ17 प्रो कंपनीने 4,015एमएएच पावर असलेल्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सह येतो जी कंपनीच्या दाव्यानुसार 53 मिनिटांत फोन फुल चार्ज करू शकते.
ओपो एफ17 प्रो व्हिडीओ















