OPPO फॅन्ससाठी मार्च असेल खास, लॉन्च होतील OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन

OPPO बद्दल काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते कि कंपनी आपल्या ‘एफ सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन्सवर काम सुरु केले आहे त्याअंतर्गत OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. लीक मध्ये सांगण्यात आले होते हे मोबाईल फोन्स फेब्रुवारी मध्ये टेक मंचावर सादर केले जातील. पण आता 91मोबाईल्सला एक्सक्सूलिव माहिती मिळाली आहे त्यानुसार ओपो एफ19 सीरीज मार्च मध्ये लॉन्च होईल आणि लवकरच भारतीय बाजारात पण सादर केली जाईल.

91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि ओपो आपल्या नेक्स्ट ‘एफ सीरीज’ वर वेगाने काम करत आहे आणि सीरीज अंतगर्त OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये लॉन्च करेल. या महिन्यात हे दोन्ही स्मार्टफोन इंडियन मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट मध्ये येतील. एफ19 सीरीज सोबतच अजून एक माहिती मिळाली आहे त्यानुसार कंपनी OPPO F21 सीरीजची पण योजना बनवत आहे जी दुसऱ्या सहामाहीत लॉन्च केली जाईल.

OPPO F17 Pro

OPPO F17 Pro कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी शानदार विजुअल क्वॉलिटी देते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 टक्के आहे.

हे देखील वाचा : iPhone सारख्या कॅमेऱ्यासह येत आहे OPPO Find X3 Pro, लॉन्चच्या आधी लीक झाली महत्वाची माहिती

OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. ओपो फोनचा सेल्फी कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर सह येतो, जो आब्जेक्ट रंगीत ठेऊन बॅकग्रांउड ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो.

OPPO F17 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली 2एमपी मोनो लेंस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: लो बजेट OPPO A15s झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 128GB स्टोरेज वेरिएंट

ओपो एफ17 प्रो एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो एफ17 प्रो कंपनीने 4,015एमएएच पावर असलेल्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सह येतो जी कंपनीच्या दाव्यानुसार 53 मिनिटांत फोन फुल चार्ज करू शकते. OPPO F17 Pro सध्या भारतीय बाजारात 21,490 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here