लॉन्चच्याआधीच समोर आले 8GB रॅम असलेल्या OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Oppo बद्दल अनेक दिवसांपासून अशी माहिती समोर येत आहे कि कंपनी लवकरच आपल्या लोकप्रिय Oppo Find X सीरीजचा विस्तार करत Oppo Find X3 सीरीजचे स्मार्टफोन्स सादर करणार आहे. आतापर्यंत कंपनीने अधिकृतपणे या सीरीजच्या लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण, बोलले जात आहे कि हा पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये टेक मंचावर सादर केली जाईल. तसेच, या सीरीज मध्ये Oppo Find X3, Oppo Find X3 Pro, Oppo Find X3 Neo आणि Oppo Find X3 Lite सारखे फोन्स सादर केले जाऊ शकतात. आता लॉन्चच्याआधी या फाइंड एक्स3 सीरीजच्या एका अपकमिंग ओपो फाइंड एक्स3 चे स्पेसिफिकेशन्स बेंचमार्क साइट्सवर लीक झाले आहेत.

OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स Geekbench (via MySmartPrice) वर समोर आले आहेत. बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर फोन मॉडेल नंबर PEDM00 सह दिसला आहे. यामुळे असे वाटत आहे कि हे ग्लोबल वेरिएंट असतील. गीकबेंचवर डिवाइसला सिंगल कोर मध्ये 4,280 आणि मल्टी कोर स्कोर 12,848 मिळाला आहे.

अलीकडेच Geekbench व्यतिरिक्त फोन AIDA64, AnTuTu सारख्या बेंचमार्क साइटवर दिसला होता, ज्यात समजले आहे कि या मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 870 SoC प्रोसेसर असेल आणि हा Android 11 सह ColorOS 11.2 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल. ओप्पो फाइंड एक्स3 8GB RAM सह सादर केला जाईल.

हे देखील वाचा : अश्याप्रकारे करा मोफत YouTube व्हिडीओ डाउनलोड

वर सांगितल्याप्रमाणे अपकमिंग Oppo Find X3 सीरीजमध्ये Oppo Find X3 सोबत Oppo Find X3 Pro, Oppo Find X3 Neo आणि Oppo Find X3 Lite सारखे स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतात. हे सर्व फोन पुढल्या काही महिन्यात लॉन्च होतील.

Oppo Find X3 काही दिवसांपूर्वी AIDA64 आणि AnTuTu बेंचमार्क साइटवर PEDM00 मॉडेल नंबरसह दिसला होता. AIDA64 वर हा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरियंटमध्ये दिसला होता. हा kona प्रोसेसरसह दिसला, ज्याबाबत बोलले जात कि हा Qualcomm चा Snapdragon 865 SoC प्रोसेसर असेल.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 भारतात एंट्री करण्यास तयार, येतील मिड-मार्च मध्ये

कॅमेऱ्याबद्दल पण काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि या सीरीजच्या फाइंड एक्स3 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी सेंसर 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेंसर आहे. यात अल्ट्रावाइड लेंस पण आहे. या फोन मध्ये 13 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे, जो 2x optical zoom सह येतो. यात 3MP ची मॅक्रो लेंस पण आहे, जी 25x zoom सह येते. ओप्पोच्या या फोन मध्ये OFILM लेंस आहे, जी सुपरझूम फीचर्ससह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here