8GB रॅमसह गीकबेंचवर लिस्ट झाला iQOO Z7x 5G; एप्रिलमध्ये येऊ शकतो भारतात

Highlights

  • iQOO Z7x 5G गीकबेंच वेबसाइटवर लिस्ट झाला.
  • आयकूचा हा फोन एप्रिलमध्ये लाँच होऊ शकतो.
  • हा फोन लेटेस्ट Android 13 वर चालेल.

iQOO सध्या मिडरेंज मध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Z7x 5G लाँच करण्याची तयारी करत आहे. हा स्मार्टफोन भारत आणि ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाईल. लीक रिपोर्ट्सनुसार, आयकूचा हा स्मार्टफोन भारतात एप्रिलमध्ये लाँच होऊ शकतो. लाँच होण्यापूर्वी हा गीकबेंच बेंचमार्किंग वेबसाइटवर 8GB रॅमसह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून फोनच्या स्पेसिफिकेशन्सची जास्त माहिती मिळाली नाही परंतु परफॉर्मन्सच्या बाबतीत खूप काही समजलं आहे.

iQOO Z7x 5G गीकबेंच लिस्टिंग

गीकबेंच लिस्टिंगच्या स्क्रीनशॉटमधून समजलं आहे की iQOO Z7x 5G (मॉडेल नंबर Vivo I2216) स्मार्टफोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 905 स्कोर मिळाला आहे तर मल्टी कोर टेस्टमध्ये 2,137 चा स्कोर मिळाला आहे. या फोनच्या मॉडेल नंबरवरून समजलं हा आहे की हा इंडिया व्हेरिएंट आहे. त्यामुळे असा अंदाज लावता येईल की iQOO लवकरच हा फोन भारतात लाँच करू शकते. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह लाँच होईल OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन

iQOO Z7x 5G स्मार्टफोन लेटेस्ट Android 13 आधारित FunTouchOS 13 स्किनवर चालू शकतो. तसेच फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टाकोर Snapdragon 695 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन अन्य व्हेरिएंटमध्ये देखील लाँच केला जाऊ शकतो. सध्या गीकबेंचवर हा फोन फक्त 8GB रॅमसह दिसला आहे. हे देखील वाचा: फ्री IPL बघण्यासाठी बेस्ट आहेत जास्त डेटा असलेले Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ प्लॅन

iQOO Z7x 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

iQOO Z7x 5G स्मार्टफोन बाबत लीक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की यात 6.65-इंचाचा FHD+ IPS LCD पॅनल दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता iQOO Z7x 5G स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह 2MP चा डेप्थ कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि USB Type-C पोर्ट दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here