वेबसाइटवर दिसला OPPO K11! डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा

Highlights

  • डिवाइसची एंट्री 25 जुलैला होणार आहे.
  • ह्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
  • 12GB रॅम +512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

ओप्पोच्या के सीरीजचा स्मार्टफोन OPPO K11 लाँचसाठी तयार आहे. डिवाइस 25 जुलैला सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर भारतासह इतर बाजारांमध्ये हा फोन येऊ शकतो. आता लाँचपूर्वीच हा डिवाइस टेक वेबसाइट प्राइस बाबानं चायना टेलीकॉम वेबसाइटवर स्पॉट केला आहे. जिथून मोबाइलच्या स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमतची माहिती समोर आली आहे.

OPPO K11 चायना टेलीकॉम लिस्टिंग

  • वेबसाइट लिस्टिंगनुसार ओप्पोचा नवीन डिवाइस PJC110 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगमध्ये फोनची इमेज देखील समोर आली आहे. त्यामुळे डिजाइन समजली आहे.
  • इमेजनुसार डिवाइसमध्ये पंच होल डिस्प्ले आहे.
  • बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे.
  • खालच्या बाजूला ओप्पोची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
  • पावर बटन आणि वॉल्यूम अप डाउन बटन उजवीकडे आहेत.
  • तसेच खाली यूएसबी टाइप सी पोर्ट, सिम ट्रे आणि स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे तर वरच्या बाजूला एक मायक्रोफोन आहे.

OPPO K11 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता लिस्टिंग नुसार, ह्यात 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 2412×1080 पिक्सल रिजॉल्यूशनसह येईल.
  • स्टोरेज : डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह सादर होऊ शकतो.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असेल.
  • बॅटरी : डिवाइस 4,870 एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.
  • OS : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएसवर चालेल.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइस ड्युअल सिम, एनएफसी, यूएसबी टाइप सी पोर्ट, ब्लूटूथ, वायफाय सारख्या फीचरसह येऊ शकतो.

OPPO K11 ची किंमत

लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन 3 स्टोरेज ऑप्शनसह येईल. ज्यात 8GB रॅम +256GB स्टोरेजची किंमत ¥2299 म्हणजे सुमारे 25,000 रुपये असू शकते. मिड व्हेरिएंट 12GB +256GB ¥2599 म्हणजे सुमारे 28,000 रुपयांचा असू शकतो. तर टॉप मॉडेल 12GB रॅम +512GB स्टोरेज ¥2799 म्हणजे सुमारे 32,000 रुपयांचा मिळू शकतो. फोन ग्लेशियर ब्लू आणि मून शेडो ह्या दोन कलर ऑप्शनमध्ये येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here