Redmi 13 5G झाला 3C सर्टिफिकेशनवर स्पॉट, 33W फास्ट चार्जिंगचा मिळेल सपोर्ट

Xiaomi लवकरच Redmi 13 5G स्मार्टफोन सादर करू शकते. काही दिवसांपूर्वी रेडमी 13 5जी बद्दल एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात फोनचा कोडनेम “breeze“ सांगण्यात आला आहे. तसेच, या फोनच्या 2406ERN9CI, 2406ERN9CC आणि 24066PC95 मॉडेल नंबर समोर आले आहेत तसेच यामध्ये एक ‘भारतीय’ मॉडेल असल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच, MSP च्या रिपोर्टनुसार Redmi 13 5G को 3C सर्टिफिकेशन साईटवर स्पॉट करण्यात आले आहे.

Redmi 13 5G 3C सर्टिफिकेशनची माहिती

अगामी Redmi 13 5G ला 2406ERN9CC मॉडेल नंबरसह 3C सर्टिफिकेशन मिळाले आहे. 3C सर्टिफिकेशनवरून माहिती मिळाली आहे की Xiaomi स्मार्टफोन 33W वायर्ड फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह असेल. तसेच, लिस्टिंगनुसार असे समजले आहे की Xiaomi नं MDY-16-ED मॉडेल नंबर एडॉप्टरसह डिव्हाईची टेस्टिंग करत आहे.

एडॉप्टरची टेस्टिंग 5V आणि 3A चे सामान्य आऊटपुट आणि 3.6 ते 11V आणि 3A मॉडेल नंबरसह करण्यात आले आहेत. सर्टिफिकेशननुसार माहिती मिळाली आहे की Xiaomi स्मार्टफोनला 5G कनेक्टिव्हिटी असेल. तसेच 3 सी सर्टिफिकेशन स्मार्टफोनच्या कोणत्या इतर स्पेसिफिकेशनचा खुलासा झालेला नाही.

जसे की वरती सांगितले की Weibo वर अलीकडेच एक टिपस्टरने खुलासा केला आहे की Xiaomi ब्रीज कोडनेम आणि N19 इंटरनल मॉडेल नंबरसह स्मार्टफोन लाँच करेल. लीकनुसार माहिती मिळाली आहे की Xiaomi क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 SoC सह स्मार्टफोन लाँच होईल. टिपस्टरने हा पण खुलासा केला आहे की डिव्हाईसमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी असेल.

Redmi 13 5G स्पेसिफिकेशन (लीक)

  • स्क्रीन : Redmi 13 5G मध्ये 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच होऊ शकतो. ही एलसीडी स्क्रीन असू शकते ज्यावर 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे.
  • प्रोसेसर : अगामी रेडमी फोन अँड्रॉईड 14 आधारित हायपरओएसवर लाँच केला जाऊ शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Poco M7 Pro 5G (Redmi 13 5G) भारतात 50 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. तसेच या मोबाईलच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा पाहायला मिळू शकते.
  • बॅटरी : रेडमी 13 5जी म्हणजे पोको एम7 प्रो 5जी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 6,000 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग दिली जाणार असल्याची आशा आहे.

Redmi 13 5G ची किंमत (लीक)

अलीकडेच समोर आलेल्या एका लीकमध्ये दावा केला जात आहे की रेडमी 13 5जी फोन भारतीय बाजारात असलेल्या Redmi 12 5G फोनपेक्षा खूप जास्त वेगळा नाही. दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन मिळते जुळते राहतील, तसेच Redmi 13 5G ची किंमत पण या रेंजमध्ये ठेवली जाईल. म्हणजे रेडमी 13 5 जी ची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here