Oppo ने आणली अनोखी टेक्नोलॉजी, आता विना नेटवर्क पण करता येईल कॉल

काही दिवसांपूर्वी भारतीय टेलीकॉम मध्ये हलचल निर्माण करणाऱ्या कंपनी रिलायंस जियो बद्दल एक बातमी समोर आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी VoWiFi नावाच्या टेक्नॉलॉजीचे ट्रायल सुरु केले आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने जियो यूजर्स नेटवर्क सिग्नलविना पण कॉल करू शकतील. तर आता चिनी कंपनी Oppo एक नवीन टेक्नॉलजी घेऊन आली आहे. या टेक्नॉलजीचे नाव MeshTalk ठेवण्यात आले आहे.

यया टेक्नोलॉजीच्या मदतीने Oppo फोन यूजर कोणत्याही सेल्युलर नेटवर्क, ब्लूटूथ आणि वाई-फाई कनेक्शनविना पण वॉयस कॉल करू शकतील. तसेच टेक्स्ट मेसेज पण पाठवता येतील. पण यासाठी तुम्ही ज्याला कॉल किंवा मेसेज करत आहेत तो फोन तुमच्या पासून 3 किलोमीटरच्या रेंज मध्ये असावा.

शांघाई मध्ये चालू असलेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये या टेक्नोलॉजीचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच कंपनीने ट्विट करून पण याची माहिती दिली आहे. Oppo नुसार यूजर्स 3 किलोमीटरच्या रेंज मध्ये ओप्पोच्या फोन वरून ओप्पो फोन मध्ये टेक्स्ट मेसेज सोबतच कॉल करू शकतील.

कंपनीने आपल्या ऑफिशल ब्लॉग पोस्ट माहिती दिली आहे कि MeshTalk एक कस्टम चिपचा वापर करते, जी डिसेंट्रलाइजेशन, फास्ट स्पीड आणि पावरचा वापर करते. तसेच अनेक डिवाइसेज एक एड हॉक लोकल एरिया नेटवर्क पण बनवू शकतील, ज्याने ग्रुप चॅट करता येईल.

ओप्पोच्या सध्याच्या स्मार्टफोन मध्ये हि टेक्नॉलॉजी चालेल कि नाही किंवा कंपनी कधी हि टेक्नॉलजी आपल्या नवीन स्मार्टफोन मध्ये घेऊन येईल हे अजून स्पष्ट झाले नाही. अंदाज लावला जात आहे कि MeshTalk टेक्नॉलजी फक्त नवीन मॉडेल्सला सपॉर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here