Oppo Reno 8T आणि Reno 8T 5G ची व्हिएतनाममध्ये एंट्री; इतकी आहे किंमत

Highlights

 • Oppo Reno 8T सीरिज जागतिक बाजारात लाँच
 • Oppo Reno 8T 5G उद्या होणार भारतात लाँच
 • 100MP कॅमेऱ्यासह Oppo Reno 8T 4G ची एंट्री

OPPO नं कोणताही गाजावाजा न करता जागतिक Oppo Reno 8T सीरिज सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत Oppo Reno 8T 4G आणि Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. सध्या हे फोन व्हिएतनाममध्ये ऑफिशियल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन उद्या भारतात येणार आहे. त्याआधीच आता या हॅंडसेट्सच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

OPPO Reno 8T 5G आणि Reno 8T 4G ची किंमत

OPPO Reno 8T 5G स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये 9.9 मिलियन VND (सुमारे 35,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह आला आहे. कंपनीनं स्टारलाइट ब्लॅक आणि डॉन गोल्ड असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.

OPPO Reno 8T 4G चे स्पेसिफिकेशन्स

 • 6.43 इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
 • 90Hz रिफ्रेश रेट
 • 100MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
 • 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Oppo Reno 8T 4G मध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन फ्लॅट आहे आणि वरच्या बाजूला सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात अली आहे. या डिवाइसच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि यात गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा मिळते. हे देखील वाचा: रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतील Vivo V27 आणि Vivo V27 Pro; लाँच पूर्वीच मोठा खुलासा

फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपलकॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 100MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. कॅमेरा रिंगमध्ये ओप्पोनं ऑर्बिट लाइट दिली आहे, जी नवीन नोटिफिकेशन आल्यावर फ्लॅश होते. Oppo च्या या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

हा फोन MediaTek Helio G99 SoC सह येतो. जोडीला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. तसेच फोन अँड्रॉइड 13-आधारित ColorOS 13 वर चालतो.

OPPO Reno 8T 5G चे स्पेसिफिकेशन्स

 • 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले
 • FHD+ रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट
 • Snapdragon 695 प्रोसेसर
 • 108MP ट्रिपल कॅमेरा
 • 4800mAh बॅटरी, 67W फास्ट चार्जिंग

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन पाहता यात 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन फुल एचडी + आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. Oppo Reno 8T 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळतो.

पावर बॅकअपसाठी यात 4800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 4G व्हेरिएंटची प्रमाणे 5G व्हेरिएंट देखील Android 13-आधारित ColorOS 13 वर चालतो. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी Reno 8T 5G मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Oppo Reno 8T 4G स्मार्टफोन पाहता हा 8.49 मिलियन VND (सुमारे 29,900 रुपये) मध्ये खरेदी करता येईल. ज्यात 8GB RAM + 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. ओप्पोचा हा फोन स्टारलाइट ब्लॅक आणि सनसेट ऑरेंज कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here