OPPO Reno10 5G सीरीजचं प्रोडक्ट पेज लाइव्ह्; लवकरच होईल भारतात एंट्री

Highlights

  • रेनो 10 सीरीज प्रोडक्ट पेज लाइव्ह झाला आहे.
  • इंडियन मॉडेल चीनी व्हर्जनपेक्षा वेगळा असेल.
  • फोन्समध्ये कर्व डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.

ओप्पोनं नवीन OPPO Reno 10 सीरीजच्या इंडिया लाँचची घोषणा केली आहे. ह्यात Oppo reno10 5G, reno10 Pro 5G आणि reno10 Pro + 5G लाँच होण्याची शक्यता आहे. अशी बातमी आली आहे की भारतात उपलब्ध होणारे हे फोन्स चायना मॉडेल्सपेक्षा अत्यंत वेगळे असतील. कंपनीच्या वेबसाइटवर सीरीजचा प्रोडक्ट पेज लाइव्ह झालं आहे आणि आता लवकरच इंडिया लाँच डेटची देखील घोषणा केली जाईल. रेनो 10 सीरीजमध्ये काय मिळू शकतं ह्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Oppo reno10 5G सीरीज

  • कंपनी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ओप्पो रेनो 10 5जी स्मार्टफोन कर्व डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच होईल.
  • फोनसाठी युजर्सना आइस ब्लू आणि सिल्व्हर ग्रे सारखे दोन कलर ऑप्शन मिळतील.
  • स्मार्टफोनमध्ये युजर्सना 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो पोट्रेट कॅमेरा देखील दिला जाईल.
  • स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल.

Oppo reno10 pro 5G आणि pro+ 5G

  • ह्या सीरीजचे Oppo reno10 pro 5G आणि Oppo reno10 pro + 5G डिवाइस पाहता दोन्ही फोन 12gb रॅम आणि 256gb पर्यंत इंटरनल स्टोरेजसह सादर होतील.स्मार्टफोनमध्ये युजर्सना सोनी IMX890 ची 50 मेगापिक्सल कॅमेरा लेन्स OIS सपोर्टसह दिली जाईल. प्रो फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो पोट्रेट कॅमेरा आणि प्रो प्लस मध्ये 64 मेगापिक्सलची टेलीफोटो पोट्रेट कॅमेरा लेन्स OIS सह दिली जाईल.
  • फोनचा प्रोसेसर पाहता बेस मॉडेल reno10 Dimensity 7050 चिपसेटसह येऊ शकतो. प्रो मॉडेल पाहता डिवाइस डायमेन्सिटी 8200 सह येऊ शकतो. तसेच, प्रो प्लस मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 8 + जेन 1 चिपसेट मिळू शकतो.

OPPO Reno 10 5G गीकबेंच लिस्टिंग

  • ओप्पो रेनो 10 5G गीकबेंच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. फोन 91mobiles ने स्पॉट केला आहे.
  • लिस्टिंगमध्ये OPPO Reno 10 5G CPH2531 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • सिंगल-कोर मध्ये 956 आणि मल्टी-कोर मध्ये 2340 स्कोर मिळवला आहे.
  • हा ओप्पो फोन अँड्रॉइड 13 ओएसवर चालेल.
  • स्मार्टफोन 8 जीबी रॅमसह दिसला आहे. परंतु लाँचच्या वेळी आणखी मॉडेल वाढू शकतात.
  • मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘MT6877V’ नंबर दिसत आहे. त्यामुळे फोनमध्ये Dimensity 7050 चिपसेट असल्याचं समजतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here