OPPO Reno10 सीरीजच्या लाँचपूर्वीच फोटोज झाले लीक; अशी असेल डिजाइन

Highlights

 • OPPO Reno10 सीरीज भारतात लवकरच लाँच होऊ शकते.
 • ह्या लाइनअपमध्ये फोन्स गेल्या महिन्यात चीनमध्ये सादर करण्यात आले होते.
 • सीरीजमध्ये Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro Plus असतील.

OPPO नं गेल्या महिन्यात चीनमध्ये Reno10, Reno10 Pro आणि Reno10 Pro+ सादर केले होते. तसेच, आता नवीन ओप्पो फोन भारतात येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर लाँच पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार भारतीय मॉडेलमध्ये काही बदल पाहायला मिळतील. 91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सकडून रेनो10 सीरीजचे लाइव्ह फोटोज मिळाले आहेत, ज्यातून डिजाइनचा खुलासा झाला आहे.

भारतात अशी असेल OPPO Reno10 सीरीजची डिजाइन

 • आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे फक्त Reno10 Pro+ ची डिजाइन चीनी मॉडेल सारखी असेल. आता आलेल्या लाइव्ह फोटोजमधून देखील हीच शक्यता स्पष्ट होताना दिसत आहे.
 • रेनो 10 प्रो + ट्वाइलाइट पर्पल आणि मून सी ब्लॅक मध्ये दिसला आहे. ह्याचा कॅमेरा मॉड्यूल देखील चीनी मॉडेल प्रमाणे दिसत आहे.
 • तसेच स्मार्टफोनमध्ये 3डी कर्व्ड डिजाइन असल्याचं समोर आलं आहे.
 • Reno10 आणि Reno10 Pro साठी बोललं जात आहे की हे दोन्ही फोन वेगवेगळ्या कॅमेरा डिजाइनसह येतील. परंतु ह्या दोन्ही मॉडेल्सचे फोटोज आमच्या हाती लागले नाहीत.
 • डिजाइनव्यतिरिक्त, भारतात लाँच होणाऱ्या OPPO Reno10 सीरीजमध्ये आणखी देखील काही बदल पाहायला मिळू शकतात.

Reno10 प्रो सीरीज स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

 • चिनी मॉडेलच्या तुलनेत देशातील OPPO Reno10 सीरीजमधील कॅमेरा आणि चिपसेट बदलला जाऊ शकतो.
 • OPPO Reno10 मध्ये स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसर ऐवजी MediaTek Dimensity 7050 चिपसेट असेल. रेनो 10 प्रो मध्ये देखील चिनी रेनो 10 मधील चिपसेट मिळू शकतो. चीनमध्ये रेनो 10 प्रो मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेटसह लाँच झाला आहे.
 • टॉप-एन्ड Reno10 Pro+ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट असेल. ह्यात कोणताही बदल होणार नाही कारण चीनी मॉडेलमध्ये देखील हाच प्रोसेसर आहे.
 • ग्लोबल मार्केटमध्ये फक्त ब्लॅक, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शन उपलब्ध होईल. गोल्ड कलर चीनसाठी एक्सक्लूसिव्ह असेल.
 • तिन्ही फोनमध्ये टेलीफोटो लेन्स असेल, असं समजलं आहे.

OPPO Reno10 सीरीज इंडिया लाँच टाइमलाइन

कंपनीनं अद्याप ह्या डिवाइसेसच्या लाँच डेटचा खुलासा केला नाही, परंतु 91मोबाइल्सला काही दिवसांपूर्वी इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली होती की रेनो 10 सीरीज जुलैमध्ये भारतात लाँच केली जाईल. आम्हाला आशा आहे की लवकरच कंपनी ऑफिशियल लाँच डेट बद्दल घोषणा करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here