Google ने प्ले स्टोर मधून काढून टाकले Paytm ला, जाणून घ्या तुमचे पैसे आहेत का सुरक्षित

भारतात डिजिटल पेमेंटसाठी प्रसिद्ध असलेला ऍप Paytm गूगल प्‍ले स्टोर वरून काढून टाकण्यात आला आहे. पेटीएम ऍप द्वारे गूगलच्या काही पॉलिसीजचे उल्लंघन झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. पेटीएम भारतात सर्वात पॉप्यूलर डिजिटल पेमेंट ऍप म्हणून ओळखला जातो. याबाबत पेटीएम म्हणत आहे कि ग्राहक त्यांचा ऍपचा वापर चालू ठेऊ शकतात आणि ग्राहकांचे पैसे पण सुरक्षित आहेत. पेटीएमचे दुसरे ऍप्‍स जसे कि Paytm Money आणि Paytm Mall अजूनही गूगल प्‍ले स्टोर वर उपलब्ध आहेत.

प्रकरण आहे तरी काय

पेटीएम वर नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत गूगलने आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये सांगितले आहे कि आम्ही अश्या ऍपला स्थान देऊ शकत नाही जो ऑनलाइन कॅश असलेले गेम्स, जुगार किंवा सट्ट्याचे आयोजन करतो. पेटीएम ‘PayTM First Games’ च्या माध्यमातून पैसे मिळवून देण्याचा दावा करत आहे.

Google ने म्हटले आहे कि, आम्ही ऑनलाइन कसिनोला परवानगी देत नाही किंवा अश्या कोणत्याही बेकायदा जुगाराच्या ऍप्सचे समर्थन करत नाही जे खेळांवर सट्टेबाजीची सुविधा देतात. जर एखादा ऍप जर वापरकर्त्यांना बाहेरच्या वेबसाइट वर घेऊन जात असेल आणि पैसे किंवा बक्षीस जिंकण्यासाठी स्पर्धेत भाग घेण्यासाठी पैसे देण्यास सांगत असेल तर हे देखील आमच्या नियमांत बसत नाही.

टेक क्रंच वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये माहिती दिली आहे कि हा निर्णय गुगलने पेटीएम द्वारे सतत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे घेतला आहे. रिपोर्ट मध्ये याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगण्यात आले आहे कि पेटीएम इंडियन प्रीमियर लीग सुरु होण्याआधी काढून टाकण्यात आला आहे. 19 सप्टेंबर पासून IPL 2020 चे आयोजन केले जाणार आहे. कोरोनावायरस महामारीमुळे आईपीएलचे आयोजन यावेळी संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here