Realme C65 ची डिझाईन आली समोर, ब्रँड हेडने शेअर केला फोटो, जाणून घ्या लाँचची तारिख

रियलमी येत्या 4 एप्रिलला आपला Realme C65 स्मार्टफोन घेऊन येत आहे. ब्रँडने कंफर्म केले आहे की हा डिव्हाईस सी सीरिज अंतर्गत जागतिक बाजारात व्हिएतनाममध्ये सादर होईल. त्याचबरोबर कंपनीच्या हेडने एक फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. ज्यात याचे डिझाईन समोर आले आहेत. चला, पुढे मोबाईलचा टिझर आणि इतर माहिती जाणून घेऊया.

Realme C65 ची डिझाईन

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आलेल्या टिझरमध्ये ब्रँड हेडने जो फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये Realme C65 आधीच्या मॉडेलपेक्षा खूप वेगळा दिसत आहे. त्याचबरोबर टिझरवरून फोनचा लूक दिग्गज ब्रँड सॅमसंग मोबाईल सारखा वाटत आहे.
  • स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर आयताकृती कॅमेरा माड्यूल पाहायला मिळत आहे. ज्यात वर्टिकल पॅटर्नमध्ये तीन सेन्सर आहे. तसेच ड्युअल कॅमेरा आणि एक सेन्सर असू शकतो. त्याचबरोबर एक एलईडी फ्लॅश दिसतो.
  • फोनमध्ये मागील बाजूस खूप चमकदार डिझाईन पाहायला मिळेल, तसेच खालच्या बाजूला रियलमीची ब्रँडिंग देण्यात आली आहे. डिव्हाईसच्या उजव्या साईडवर पावर आणि वॉल्यूम बटन देण्यात आले आहेत.
  • कलर ऑप्शन पाहता Realme C65 दोन कलर ऑप्शनमध्ये टिझरमध्ये पाहिला गेला आहे. जे ब्लॅक आणि ब्लू आहेत.

Realme C65 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: अजून Realme C65 फोनच्या डिस्प्लेच्या आकाराची माहिती मिळालेली नाही, परंतु हा एफएचडी प्लस रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येऊ शकतो.
  • प्रोसेसर: फोनच्या प्रोसेसरबद्दल समोर आले आहे की हा डिव्हाईस मीडियाटेक हेलिओ जी85 चिपसेटसह लाँच होऊ शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत Realme C65 मध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची चर्चा आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता फोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह ठेवला जाऊ शकतो, ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स असण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि याला फास्ट चार्ज करण्यासाठी 45 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिव्हाईसला लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित रियलमी UI 5.0 वर आधारित ठेवले जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here