Realme 2020 सेल झाला सुरु, 5,999 रुपयांमध्ये मिळेल रियलमी स्मार्टफोन

नवीन वर्षाच्या निमित्ताने Realme ने ग्राहकांना शानदार भेट देत ऑनलाइन ई-कॉमर्स साइट वर आपल्या 2020 सेलचे आयोजन केले आहे. हा सेल ऑनलाइन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइट Realme.com वर आज म्हणजे 2 जानेवारी 2020 पासून सुरु झाला आहे.

2 जानेवारी ते 5 जानेवारी 2020 पर्यंत हा सेल चालू राहील. या सेल मध्ये तुम्ही Realme C2, Realme 5 Pro, Realme 3i, Realme 3 pro, Realme X, Realme XT आणि दुसऱ्या फोन्स वर शानदार डिस्काउंट मिळवू शकता. चला जाणून घेऊया तुम्हाला फोन्स वर मिळणाऱ्या डिस्काउंट आणि ऑफर्स बद्दल.

फ्लिपकार्ट वर ऑफर्स

या सेल मध्ये कंपनी फोन्स वर डिस्काउंट सोबतच अनेक शानदार ऑफर्स देत आहे. या सेल मध्ये फ्लिपकार्ट वर Axis Bank Credit Card वरून फोनचे पेमेंट केल्यास 5 टक्के आणि Axis Bank Buzz क्रेडिट कार्ड वर 10 टक्के डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर निवडक फोन वर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर पण दिली जात आहे.

Realme च्या वेबसाइट वरील ऑफर्स

Realme च्या वेबसाइट वर MobiKwik ने पेमेंट केल्यास ग्राहकांना 1000 रुपयांपर्यंत 10% सुपरकॅश मिळेल. इतकेच नव्हे तर कंपनीच्या Cashify सह असलेल्या भागेदारी अंतर्गत ग्राहकांना वेगळा 500 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल.

स्मार्टफोन्स वर ऑफर

स्मार्टफोन्स वर मिळणाऱ्या ऑफर्स बद्दल बोलायचे तर Realme C2 वर या सेल मध्ये 500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच या सेल मध्ये Realme C2 चा 2GB+32GB वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच डिवाइसचा 3GB+32GB व्हेरिएंट 6,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

तसेच सेल मध्ये Realme 3 वर 1,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. या फोनचा बेस वेरिएंट 3GB + 32GB 500 रुपयांच्या डिस्काउंट सह 7,499 रुपये, 3GB + 64GB वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 7,999 रुपये आणि 4GB + 64GB वेरिएंट 1500 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

त्याचप्रमाणे Realme 3i कंपनी 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत आहे. तसेच Realme 3 Pro 9,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकला जात आहे. त्याचप्रमाणे या सेल मध्ये Realme XT पण 14,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकला जात आहे. कंपनी Realme 5 2020 सेल मध्ये 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत आहे. Realme 5 Pro वर कंपनी 1000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

रियलमी 5 वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here