4 मार्चला लॉन्च होईल रियलमी 3, शाओमीला मिळेल टक्कर

रियलमी ब्रँड आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 3 आणणार आहे आणि याची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. कंपनीच्या सीईओ ने पण वेळोवेळी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफार्म वरून रियलमी 3 बद्दल माहिती दिली आहे. रियमली सीईओ माधव सेठ यांनी कालच सांगितले होते कि कंपनीचा आगामी स्मार्टफोन रियलमी 3 मीडियाटेकच्या हे​लीयो पी70 चिपसेट सह येईल. आज या फोनची लॉन्च डेट पण समोर आली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आफिशियल घोषणा केली आहे कि रियलमी 3 येत्या 4 मार्चला भारतात लॉन्च होईल.

रियलमी 3 च्या लॉन्च डेटची माहिती कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्वीटर हँडल वरून दिली आहे. ट्वीट मधून सांगण्यात आले आहे ​कि रियलमी 3 स्मार्टफोन येत्या 4 मार्चला इंडिया मार्केट मध्ये येईल. लॉन्च डेटच्या आधीच माधव सेठ यांनी असे पण सांगितले आहे कि रियलमी 3 मध्ये मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट असेल. यह चिपसेट 40 टक्क्यांपर्यंत बॅटरीचा वापर कमी करतो तसेच कोणताही कंटेंट इंटरनेट वरून डाउनलोड करताना 30 टक्क्यांपर्यंत जास्त स्पीड देईल.

ट्वीट मध्ये मधून मिळाली माहिती
रियलमी 3 च्या लॉन्च डेट व्यतिरिक्त कंपनीने फोनचा सेल तसेच याच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. माधव सेठ यांचे ट्वीट पाहता यात सांगण्यात आले आहे कि, ‘या फोन मध्ये पावर आणि स्टाईल साठी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. म्हणजे रियलमी 3 एकाकडे स्टाईलिश लुक आणि डिजाईन सह सादर केला जाईल तर दुसरीकडे या फोन मध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स पण मिळतील.

रियलमी 3 चा लुक
रियलमी ने कालच अजून एक ट्वीट केले होते ज्यात डायमंड कट असलेल्या एखाद्या फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला होता. या ट्वीट मध्ये कंपनी ने रीइन्ट्रड्यूजीग असे लिहिले आहे. म्हणजे काही तरी पून्हा येणार आहे. कंपनी ने फोटो सोबत जास्त काही लिहिले नाही पण या ट्वीट नंतर बोलले जात आहे कि रियलमी 3 पण डायमंड कट वाल्या बॅ​क पॅनल सह सादर केला जाऊ शकतो. या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे.

रियलमी 3 स्पेसिफिकेशन्स
रियलमी 3 संबंधित कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती कंपनीने दिली नाही. पण आतापर्यंत समोर आलेले लीक्स पाहता हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित असेल तसेच या फोन मध्ये 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो. बोलले जात आहे कि कंपनी या फोनचे एकापेक्षा जास्त वेरिएंट बाजारात आणेल ज्यांची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here