Realme ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात ‘रियलमी 6 सीरीज’ सादर करत दोन नवीन फोन Realme 6 आणि Realme 6 Pro लॉन्च केले होते. जगात सर्वात आधी ही फोन भारतात लॉन्च झाले होते. सीरीजचा एक मॉडेल सिंगल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला होता तर प्रो मॉडेल मध्ये डुअल पंच-होल देण्यात आला होता. इंडियन मार्केट नंतर आता या सीरीजने ग्लोबल मार्केट मध्ये पण टाकले आहे. कंपनीने आज म्यानमार मध्ये रियलमी 6 सीरीज लॉन्च केली आहे. खास बाब अशी कि कंपनीने म्यानमार मध्ये रियलमी 6 किंवा रियलमी 6 प्रो नाही तर Realme 6i स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो आतापर्यंत टेक बाजारात आला नव्हता.
Realme 6i लुक
Realme 6 आणि Realme 6 Pro स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले वर बनले आहेत तर Realme 6i वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला गेला आहे. फोनच्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन बेजल लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत परंतु खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. Realme 6i च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व सिम स्लॉट देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर पावर बटण आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर सह यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे.
Realme 6i स्पेसिफिकेशन्स
रियलमी 6आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.5 इंचाच्या मिनीड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो रियलमी यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कोणताही फोन या चिपसेट सह लॉन्च झाला नाही. म्हणजे Realme 6i जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यात या प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे.
Realme 6i कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Realme 6i च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फीसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Realme 6i डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर बॅकअपसाठी Realme 6i मध्ये यूएसबी टाईपी सी पोर्ट सह 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत पाहता Realme 6i च्या 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत KS.249,900 म्हणजे जवळपास 13,000 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत KS.299,900 म्हणजे जवळपास 15,500 रुपये आहे.















