Realme C51 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, जाणून घ्या माहिती

Highlights

  • डिवाइसच्या बॅक पॅनलवर ड्युअल टोन फिनिश आहे.
  • इमेजमध्ये ड्युअल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश दिसला आहे.
  • मिनी कॅप्सूल फीचर देखील दिसत आहे.

रियलमी सतत आपल्या सी सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनीनं अलीकडेच नवीन Realme C53 स्मार्टफोन लाँच केला आहे. आता नवीन लीकमधून Realme C51 फोन समोर आला आहे. विशेष म्हणजे टिपस्टरनं ह्याच्या डिजाइनसह काही प्रमुख स्पेसिफिकेशनदेखील जगासमोर ठेवले आहेत. चला एक नजर टाकूया लीकमधून समोर आलेल्या माहितीवर.

Realme C51 डिजाइन (लीक)

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Realme C51 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन टिपस्टर पारस गुगलानीनं शेयर केले आहेत.
  • लीकनुसार डिवाइस फ्लॅट फ्रेम डिजाइन आणि राउंड कॉर्नरसह येईल.
  • डिवाइसच्या बॅक पॅनलवर ड्युअल टोन फिनिश असेल.
  • डिवाइसच्या मागील बाजूस तीन वर्तुळाकार कटआउट दिसत आहेत ज्यात ड्युअल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश आहे.
  • फोनच्या उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन आणि डावीकडे सिम ट्रेचा ऑप्शन आहे.
  • इमेजमध्ये दिसत आहे की डिवाइस स्यान ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये येईल.
  • डिवाइसच्या फ्रंटला वॉटर ड्रॉप नॉच आहे.
  • इमेज मध्ये मिनी कॅप्सूल फीचर देखील दिसत आहे

Realme C51 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • स्टोरेज : टिप्स्टरनुसार हा डिवाइस 8GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • डिस्प्ले : ह्यात 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो हाय रिजॉल्यूशन आणि सामान्य रिफ्रेश रेट देऊ शकतो.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा : फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळू शकतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल सिम 4G सपोर्ट, ब्लूटूथ, वायफाय सारखे ऑप्शन मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here