Realme C55 लवकरच कंपनीच्या सी सीरिजमध्ये सादर केली जाऊ शकतो, जो ब्रँडचा पहिला फोन असेल ज्यात iPhone 14 सारखं डायनॅमिक आयलंड फिचर मिळू शकतं. अलीकडेच या स्मार्टफोनचा एक अनबॉक्सिंग व्हिडीओ लीक झाला होता ज्यात याच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला होता. आता रियलमीनं अधिकृतपणे Realme C55 चा टीजर रिलीज केला आहे. या टीजरमध्ये फोनचा सनशॉवर कलर दाखवण्यात आला आहे.
त्याचबरोबर टिपस्टर पारस गुगलणीनं दावा केला आहे की रियलमी सी55 स्मार्टफोन पुढील आठवड्यात 7 मार्चला जागतिक बाजारात लाँच होऊ शकतो आणि त्यांनतर लागेचच दुसऱ्या दिवशी या स्मार्टफोनची विक्री सुरु होऊ शकते. त्यामुळे लवकरच या स्मार्टफोनबाबत अधिक माहिती कंपनीकडून दिली जाऊ शकते. पारसनुसार या फोनचा भारतीय लाँच जागतिक लाँचनंतर काही दिवसांनी आयोजित केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 10 मार्चला भारतात लाँच होऊ शकतो Moto G73 5G; भारतातील पहिला Dimensity 930 चिपसेट असलेला फोन
[Exclusive]
Realme C55 launching on 7th march globally and later in india ✅✅
64MP AI Camera
8GB RAM + 256GB ROM
16GB Dynamic RAM"
33W SUPERVOOC Charge
5000mAh Massive Battery
Helio G88Sale will begin the next day after launch ✅#RealmeC55 #Realme pic.twitter.com/9AujP4UU3i
— Paras Guglani (@passionategeekz) February 28, 2023
Realme C55 चे लीक स्पेसिफिकेशन्स
- 6.72” FHD+ IPS LCD display
- MediaTek Helio G88 SoC
- 8GB RAM 256GB storage
- Android 13
- 5,000mAh battery, 33W Fast Charging
लिक्सनुसार रियलमी सी55 स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. या फोनमध्ये फ्लॅट बेजल मिळू शकतात, तसेच डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंचहोल दिला जाऊ शकतो. फोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट मिळू शकतो, जोडीला 6GB LPDDR4X RAM आणि 128GB eMMc 5.1 स्टोरेज मिळू शकते. टिपस्टर पारसनं दावा केला आहे की हा फोन 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये देखील येऊ शकतो.
हा फोन अँड्रॉइड 13 सह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. तसेच यात 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. कनेक्टव्हिटीसाठी यात 4G, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळू शकते. सिक्योरिटीसाठी कंपनी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करू शकते.
फोनच्या बॅक पॅनलवरील कॅमेरा सेटअपची जास्त माहिती उपलब्ध झाली नाही. Realme C55 मध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 8MP चा फ्रंट कॅमेरा देऊ शकते. हे देखील वाचा: भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची जबरदस्त रेंज