7,999 मध्ये विकला जाईल Nokia C12 Plus; इथे पाहा कसे असतील या स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स

Highlights

  • Nokia C12 Plus ची किंमत 7,999 रुपये असेल.
  • हा फोन येत्या काही दिवसांत सेलसाठी उपलब्ध होईल.
  • Nokia C12 आणि C12 Pro नंतर हा सीरीजचा तिसरा फोन असेल.

नोकिया भारतात अजून एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. हा मोबाइल Nokia C12 Plus नावानं बाजारात येईल जो लो बजेट सेग्मेंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे ज्यात फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती देण्यात आली आहे. नोकिया सी12 प्लसची किंमत 7,999 रुपये असेल, ज्यात 2GB RAM, HD+ Display, 8MP Camera, Unisoc प्रोसेसर आणि 4,000mAh Battery दिली जाईल.

नोकिया सी12 प्लसचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.3″ एचडी+ डिस्प्ले
  • 2जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज
  • 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा
  • 5 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर
  • 4,000एमएएच बॅटरी

Nokia C12 Plus चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, हा स्मार्टफोन 720 X 1520 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन ‘यू’ शेप वाॅटरड्राॅप नाॅच स्टाईल असून याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली मोठा चिन पार्ट देण्यात आला आहे. नोकिया इंडिया वेबसाइटवर हा फोन 2जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे, त्याचबरोबर 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 256जीबी मेमरी कार्डचा सपोर्ट देखील आहे. हे देखील वाचा: 16जीबी रॅम आणि 50एमपी कॅमेरा! Infinix Hot 30 ची थायलँड मध्ये लाँच

नोकिया सी12 प्लस अँड्रॉइड 12 ‘गो’ एडिशनवर लाॅन्च झाला आहे ज्यात 1.6गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेला यूनिसोक ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. अँड्रॉइड गो असल्यामुळे या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड आणि इन्स्टाल करता येतील जे कमी रॅम व स्टोरेजमध्ये स्मूद प्रोसेस करू शकतात. हे अ‍ॅप्स कमी स्टोरेज घेतात आहेत तसेच बॅटरी व इंटरनेट डेटाचा वापर देखील कमी करतात.

फोटोग्राफीसाठी Nokia C12 Plus सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाइटसह 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे तर सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलची लेन्स आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. या नोकिया फोनमध्ये 3.5एमएम जॅक, मायक्रोयूएसबी, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: 5000एमएएच बॅटरीसह लाँच झाला Vivo Y11 4G; जाणून घ्या किंमत

कंपनीनं Nokia C12 Plus च्या किंमतचा खुलासा वेबसाइटवरच करण्यात आला आहे. या फोनची प्राइस 7,999 रुपये आहे. नोकियानं सध्या फोनच्या अधिकृत लाॅन्च डेट तसेच याची सेलची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच ही माहिती देखील उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here