भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची रेंज

Highlights

  • Matter AERA ई-बाइक चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे.
  • ई-बाइकची किंमत Rs. 1.43 आणि Rs. 1.54 लाख दरम्यन आहे.
  • इलेक्ट्रिक बाइकमध्ये रियर व फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

EV स्टार्टअप Matter नं भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरबाइक 125KM रेंजसह लाँच केली आहे. ही ई-बाइक कंपनीनं सर्वप्रथम Auto Expo 2023 मध्ये प्रदर्शित केली होती. तसेच आता ही इंडियन ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीनं ही ई-बाइक को AERA नावानं सादर केली आहे. त्याचबरोबर ही चार व्हेरिएंट्समध्ये आली आहे, ज्यात AERA 4000, AERA 5000, AERA 5000+ आणि AERA 6000+ चा समावेश आहे. परंतु सध्या AERA 4000 आणि AERA 6000+ ची किंमत आणि इतर माहिती समोर आली नाही.

Matter Aera ची किंमत

कंपनीनुसार, ही भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरबाइक आहे. प्राइस पाहता, AERA 5000 इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत 1,43,999 रुपये आणि AERA 5000+ ची किंमत 1.54 लाख रुपये आहे. तसेच सध्या कंपनीच्या साइटवर प्री-रजिस्ट्रेशनसाठी AERA 5000 आणि AERA 5000+ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर Matter AERA सह ग्राहकांना 3 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी आणि 3 वर्षांचे रोडसाइड असिस्टंट आणि AMC/Labour कव्हरेज कंपनी देणार आहे. हे देखील वाचा: स्वदेशी 5G वापरण्यासाठी येतोय स्वदेशी स्मार्टफोन; लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

Matter AERA 5000 आणि AERA 5000+ ची वैशिष्ट्ये

या ई-बाइकमध्ये दोन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅकचे ऑप्शन मिळतात, ज्यात 5 kWh आणि 6 kWh चा समावेश करण्यात आला आहे. परंतु 6 kWh चा बॅटरी पॅक फक्त AERA 6000+ मॉडेलमध्ये उपलब्ध होईल. सध्या कंपनीनं या दोन्ही बॅटरी पॅक मधून मिळणाऱ्या रेंजचा खुलासा केला नाही परंतु हे बॅटरी पॅक 5 तासांत पूर्णपणे चार्ज केले जाऊ शकतात किंवा 2 तासांत फास्ट चार्जरनं फुल टॉप-अप करता येतात.

Matter AERA 5000 आणि AERA 5000+ मध्ये 10 kW इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. यात हायपरशिफ्ट 4-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सच्या माध्यमातून पावर जनरेट केली जाते. कंपनीनं दावा केला आहे की इलेक्ट्रिक बाइक 6 सेकंदात 0-60 किमी ताशी वेग गाठू शकते. हे देखील वाचा: 10 मार्चला भारतात लाँच होऊ शकतो Moto G73 5G; भारतातील पहिला Dimensity 930 चिपसेट असलेला फोन

AERA मध्ये 4G, WiFi आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची LCD टचस्क्रीन आहे. तसेच यात एक स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन देखील आहे, जी युजर्सना सर्व माहिती स्मार्टफोनवर पुरवण्याचं काम करतं. यात चार राइडिंग मोड्स मिळतात. यात 9-अ‍ॅक्सिस इनर्शियल मेजरमेंट यूनिट (IMU) देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here