realme narzo 70 5G 16 जीबी पर्यंत रॅम, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

रियलमीने आपल्या नारजो 70 सीरिजचे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले आहेत. यात realme narzo 70 5G आणि realme narzo 70x 5G चा समावेश आहेत. जर सामान्य मॉडेल नारजो 70 5 जी पाहता यात युजर्सना डायनॅमिकला सपोर्टसह 16GB पर्यंत रॅम, दमदार फोटोग्राफी एक्सपीरियंससाठी 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 45 वॉट फास्ट चार्जिंग, 6.67 इंचाचा डिस्प्ले, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी आयपी 54 रेटिंग सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. चला, पुढे किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Realme Narzo 70 5G ची किंमत आणि उपलबद्धता

  • Realme Narzo 70 5G च्या 6GB रॅम +128GB स्टोरेज असणाऱ्या बेस मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे.
  • हा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये 16,999 रुपयांमध्ये आला आहे. दोन्ही मॉडेलवर 1,000 रुपयांचे कुपन डिस्काऊंट दिला जात आहे.
  • Realme Narzo 70 ची पहिली सेल 25 एप्रिलला Amazon आणि realme.com वर होईल.
  • फोनसाठी युजर्सना मिस्टी फॉरेस्ट ग्रीन आणि स्नो माउंटेन ब्लू सारखे दोन कलर मिळतील.

realme narzo 70 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.67 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • डाइमेंसिटी 7050 5G चिपसेट
  • 8GB रॅम+128GB स्टोरेज
  • 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
  • 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 5000mAh बॅटरी
  • 45 वॉट सुपरवूक चार्जिंग
  • आयपी 54 रेटिंग
  • अँड्रॉईड 14

डिस्प्ले

realme narzo 70 5G फोनमध्ये युजर्सना 6.67 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले प्रदान केला जात आहे यावर 2400 x 1080 चा FHD +रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 92.65% स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 100% P3 कलर गमट आणि 1200 निट्स ब्राइटनेस सारखे फिचर्स मिळतील.

प्रोसेसर

realme narzo 70 5G मध्ये ब्रँडने युजर्सना दमदार अनुभव करण्यासाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 5G चिपसेटचा वापर केला आहे हा 6 नॅनोमीटर प्रक्रियावर चालतो ज्यात अल्ट्रा लो पावर कंजप्शन असेल. तसेच या चिपसेटसह युजर्सना 2.6Ghz पर्यंतचे क्लॉक स्पीड मिळते, तसेच सोबत ग्राफिक्ससाठी माली जी 68 जीपीयू देण्यात आला आहे.

स्टोरेज

फोनमध्ये मेमरीबद्दल पण कंपनीने चांगले काम केले आहे, कारण या बजेट रेंज असणाऱ्या डिव्हाईसमध्ये ब्रँडने 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. त्याचबरोबर डायनामिकला सपोर्टसह 8GB एक्स्ट्रा रॅमची सुविधा आहे. म्हणजे की तुम्ही एकूण मिळून 16GB पर्यंतचा पावरचा वापर करू शकता.

कॅमेरा

कॅमेरा पाहता realme narzo 70 5G ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडीसह येतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळत आहे तसेच 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी घेणे आणि रिल बनविण्यासाठी युजर्सना 16 मेगापिक्सलची फ्रंट लेन्स देण्यात आली आहे.

बॅटरी

फोनला चालवण्यासाठी यात ब्रँडने 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. ज्यामुळे युजर्सना जास्त वेळाचा बॅकअप मिळतो. हेच नाही तर बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी 45 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की या बॅटरीसह युजर्सना 518 तासाचा स्टॅन्डबाय टाईम मिळू शकतो.

इतर

मोबाईलमध्ये युजर्सना रेन वॉटर टच फिचर, वीसी कूलिंग सिस्टम, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी आयपी 54 रेटिंग, Hi-Res ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक ऑप्शन मिळतात.

कनेक्टिव्हिटी

कनेक्टिव्हिटीसाठी realme narzo 70 5G स्मार्टफोनमध्ये 9 5G बँड काला सपोर्ट आहे यात ड्युअल सिम 4G, 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे.

ऑपरेटिंग सिस्टम

ऑपरेटिंग सिस्टम पाहता ब्रँडने डिव्हाईसला लेटेस्ट अँड्रॉईड 14 वर आधारित ठेवले आहे. तसेच हा रियलमी युआय 5.0 वर आधारित आहे. कंपनीचा दावा आहे की युजर्सला फोनसह 2 वर्षाचे ओएस अपडेट आणि 3 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here