मात्र 11,999 रुपयांमध्ये आला realme narzo 70x 5G, जाणून घ्या संपूर्ण माहिती

रियलमीने 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवीन realme narzo 70x 5G लाँच केला आहे. त्याचबरोबर नारजो 70 सीरिजचा Realme Narzo 70 5G पण सादर केला आहे. तसेच, 70 एक्स मॉडेल पाहता यात कमी किंमतीत युजर्सना पावरफुल फिचर्स सादर करण्यात आले आहेत. डिव्हाईसमध्ये रेन वॉटर टच फिचर, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP54 रेटिंग, ड्युअल स्टूडियो स्पिकर मिळेल. चला, पुढे किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Realme Narzo 70x 5G ची किंमत आणि उपलबद्धता

  • Realme Narzo 70x 5G के 4GB + 128GB व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत 11,999 रुपये आहे.
  • फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेजची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे.
  • तसेच 4GB रॅम ऑप्शनवर 1,000 रुपयांचे कुपन डिस्काऊंट मिळतो, तर 6GB वर 1,500 रुपयांची सूट दिली जात आहे.
  • नवीन Narzo 70x 5G मिस्टी फॉरेस्ट ग्रीन आणि स्नो माऊंटेन ब्लू सारख्या दोन कलरमध्ये येतो. याची सेल 25 एप्रिलपासून Amazon आणि realme.com वर होईल.

realme narzo 70x 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.72 इंचाचा एचडी +डिस्प्ले
  • डाईमेंसिटी 6100+ चिपसेट
  • 6GB रॅम +128 जीबी स्टोरेज
  • 50MP ड्युअल रिअर कॅमेरा
  • 5000mAh ची बॅटरी
  • 45 वॉट सुपरवूक चार्जिंग
  • अँड्रॉईड 14

डिस्प्ले: realme narzo 70x 5G मध्ये युजर्सना 6.72 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनवर 1080 x 2400 एचडी + रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 240 टच सॅम्पलिंग रेट, 1500:1 कंट्रास्ट रेश्यो आणि 800 निट्स ब्राईटनेस मिळते.

प्रोसेसर: मोबाईलमध्ये कंपनीने परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 6100 प्लस चिपसेट दिली आहे. हा 2.2Ghz पर्यंतचा हाई क्लॉक स्पीड प्रदान करतो, ज्यामुळे गेमिंगसह इतर ऑपरेशनमध्ये स्मूद अनुभव मिळतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी 57 जीपीयू लावला आहे.

स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईस दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात 4GB रॅम +128 जीबी स्टोरेज आणि 6GB रॅम +128 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. फोनमध्ये रॅमला वाढवण्यासाठी 6GB पर्यंत डायनॅमिकला सपोर्ट पण आहे. ज्यासाठी 12 जीबी पावरचा उपयोग केला जाऊ शकतो.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता realme narzo 70x 5G ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि दोन मेगापिक्सलचा इतर लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी: realme narzo 70x 5G ला पावर देण्यासाठी डिव्हाईसमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 45 वॉट सुपरवूक चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे. कंपनीचा दावा आहे की हा फक्त 31 मिनिटांमध्ये 50% पर्यंत चार्ज होतो.

इतर:इतर फिचर्स पाहता मोबाईल रेन वॉटर टच फिचर, एयर जेस्चर फिचर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी आयपी 54 रेटिंगसह आहे.

कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी डिव्हाईसमध्ये ड्युअल सिम 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाईप सी पोर्ट सारखे ऑप्शन मिळतील.

ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता realme narzo 70x 5G स्मार्टफोन अँड्रॉईड 14 सह रियलमी युआय 5.0 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here