वाहनासाठी हवा 0001 नंबर? असा करा ऑनलाइन अर्ज

कार किंवा बाइकसाठी अनेकांना VIP Number Plate हवी असते. तुम्हाला देखील तुमच्या वाहनासाठी एखादा व्हीआयपी नंबर हवा असेल तर तो तुम्ही खरेदी करू शकता. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि ऑनलाइन देखील करता येते. पुढे आम्ही तुम्हाला व्हीआयपी नंबर मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.

तुमच्या आवडीच्या रजिस्ट्रेशन नंबरसाठी कसा करायचा अर्ज:

 • सर्वप्रथम https://vahan.parivahan.gov.in/fancy/faces/public/login.xhtml वर जा.
 • त्यानंतर तुम्हाला पब्लिक युजर म्हणून रजिस्ट्रेशन करा.
 • त्यानंतर ईमेल आयडी आणि पासवर्डसह लॉगइन करा.
 • लॉगिन झाल्यावर मेन्यूमध्ये जाऊन user other services टॅबवर क्लिक करा. त्यानंतर search by number वर क्लिक करा.
 • तुम्हाला हवा तो नंबर निवडा आणि E Auction टॅबवर क्लिक करा.
 • तुमचा रिजर्व्ड नंबर निवडण्यासाठी नंबर सिलेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करा.
 • पुढील पेजवर आलेला अर्ज भरा आणि सबमिट बटनवर क्लिक करा.
 • आता तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि त्यानंतर तुमची फी रीसीट जनरेट होईल.
 • फीस जमा केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या नंबरच्या लिलावात सहभागी व्हावं लागेल. जर तुम्ही लिलाव जिंकला तर तो नंबर तुमच्या नावावर रजिस्टर केला जाईल.

नोट : E Auction चं रजिस्ट्रेशन दर रविवार सकाळी 9 ते मंगळवारी रात्री 12 पर्यंत सुरु असतं.

व्हीआयपी नंबर प्लेटची किंमत

 • Single Digit कॅटेगरीचे नंबर जसे की 0003, 0005, 0009 इत्यादींसाठी बेस प्राइस 3 लाख रुपये असते.
 • Semi-Fancy कॅटेगरीचे नंबर जसे की 0100, 0666, 4444, 8000 इत्यादींसाठी बेस प्राइस 1 लाख रुपये असते.
 • अन्य व्हीआयपी नंबर जसे की 0786, 0010, 0099 इत्यादींसाठी 2 लाख रुपयांची बेस प्राइस असते.

प्रश्न-उत्तरे (FAQs)

व्हीआयपी नंबर प्लेटचा काय फायदा?

VIP नंबरचा कोणताही खास फायदा नाही. परंतु लोक आपल्या आवडीपोटी हे नंबर खरेदी करतात. व्हीआयपी नंबर प्लेट तुमच्या वाहनाकडे लोकांचे लक्ष खेचतात. काही लोक आपल्या कारसाठी फॅन्सी नंबरवर लाखो खर्च करतात.

व्हीआयपी नंबरची किंमत किती?

Super Elite कॅटेगरीचे नंबर जसे की 0001 साठी बेस प्राइस 5 लाख रुपये असते.

पिवळी नंबर प्लेटचा अर्थ काय?

पिवळी नंबर प्लेट असलेल्या वाहनाचा वापर फक्त ऑटो रिक्शा, टॅक्सी, ट्रक आणि बसेससाठी केला जातो. म्हणजे व्यावसायिक वापरासाठी पिवळी नंबर प्लेट असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here