Exclusive : लवकर भारतात लाँच होईल Realme Note 50, 7,000 रुपयांपासून सुरु होईल किंमत

प्रमुख मोबाइल फोन निर्माता कंपनी रियलमीने आपली नवीन सीरिजची सुरुवात केली आहे. कंपनीनं फिलिपिंसमध्ये Realme Note 50 मॉडेलला सादर केले आहे, जो की एक बजेट फोन आहे. या फोनच्या लाँच सोबत बातमी आली आहे की कंपनी लवकरच याला दुसऱ्या देशांमध्ये पण सादर करू शकते. तसेच आज 91मोबाइल्सला याबाबतची खास माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, लवकरच हा फोन भारतात पण उपलब्ध होईल. आम्हाला ही माहिती इंडस्ट्री सोर्सकडून मिळाली आहे. ज्यांनी याआधी पण अशी अनेक माहिती शेअर केली आहे.

भारतात Realme Note 50 ची इंडिया टेस्टिंग सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, Realme Note 50 ला भारतात मार्च, 2024 मध्ये लाँच करण्याचा प्लॅन करत आहे. कंपनी याला फेब्रुवारीनंतर कधी पण सादर करू शकते. सध्या भारतात याचे काही टेस्टिंग मॉडेल कंपनीकडे उपलब्ध आहेत, लाँचच्या आधी रियलमीच्या काही एग्जीक्यूटिव द्वारे टेस्ट केला जात आहे.

Realme Note 50 भारतातील किंमत

खास गोष्ट ही आहे की भारतात पण कंपनी रियलमी नोट 50 ला बजेट सेगमेंटमध्ये ठेवणार आहे. आमच्या सर्व सोर्सनं माहिती दिली आहे की भारतीय बाजारात हा फोन 7 हजार रुपयांपासून 10 हजार रुपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध होईल. हा फोन दो-तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो.

Realme Note 50 चे स्पेसिफिकेशन्स

जसे की आम्ही सुरुवातीला सांगितले होते की रियलमी नोट 50 ला फिलिपींसमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच यामध्ये फोनचे स्पेसिफिकेशन पहिलेच उपलब्ध आहेत. या फोनमध्ये 6.74 इंचाची HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीनं एलसीडी पॅनलचा उपयोग केला आहे आणि याची स्क्रीन रिजॉल्यूशन 1600×720 पिक्सल आहे. हा फोन 90Hz रिफ्रेश रेटसह 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.

हा फोन UNISOC T612 चिपसेटवर चालतो, ज्यात 1.82Ghz क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर तुम्हाला मिळतो. फिलिपींसमध्ये याला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. भारतात याचे काही दुसरे स्टोरेज ऑप्शन पण पाहायला मिळू शकतात.
कॅमेरा सेगमेंटबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये तुम्हाला 13 मेगापिक्सल रिअर कॅमेऱ्यासह एक मोनोक्रोम सेन्सर मिळेल. तसेच सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme Note 50 मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, हा 10 वॉट चार्जिंगसह येतो.
कनेक्टिव्हिटी व सिक्योरिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम सह साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फिचर आणि आयपी 54 रेटिंग मिळतो. फोनमध्ये वाय-फाय सह ब्लूटूथ 5.0 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here