रियलमीने आणला स्वस्त 5G स्मार्टफोन Realme V3, जाणून घ्या याची किंमत

Realme V3 स्मार्टफोन चीन मध्ये आयोजित वर्चुअल इवेंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. या इवेंट मध्ये कंपनीने आपली नवीन Realme X7 सीरीज पण सादर केली आहे. रियलमी वी3 कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन आहे. फोनचा लूक व डिजाइन अगदी Realme C15 सारखी वाटत आहे, जो अलीकडे इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला गेला होता. पण स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत Realme V3 वेगळा आहे.

फोन मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पुढे एक नॉच आहे, तर मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप चौकोनी आकारात आहे. डिवाइस मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या पॅनल वर आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे. फोन मध्ये 20:9 आस्पेक्ट रेश्यो सह मोठा 6.5-इंचाचा एचडी+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 88.7 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो आहे.

फोटो आणि वीडियो कॅप्चार करण्यासाठी Realme V3 मध्ये मागे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. सेटअप मध्ये अपर्चर f/2.2 सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, अपर्चर f/2.4 सह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि अपर्चर f/2.4 सह 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फ्रंटला अपर्चर f/2.0 सह 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे, जो नॉच मध्ये आहे. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये 5G, 4G LTE, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ v5.0, GPS / A-GPS, Glonass, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी USB टाइप- C पोर्टचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh च्या बॅटरी सह 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.

रियलमीच्या स्वस्त 5जी फोन Realme V3 मध्ये MediaTek Dimensity 720 SoC आहे. MediaTek डाइमेंशन 700 सीरीजचा उद्देश्य रोज वापरता येणाऱ्या 5जी स्मार्टफोन्स मध्ये चांगला अनुभव देण्याचा आहे. हा चिपसेट 5G मॉडेम सह पूर्णपणे एका छोट्या 7nm चिप मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच यात 8GB पर्यंतचा LPDDR4X रॅम आणि 128GB तक की UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Realme V3 कंपनी द्वारे 3 कॉन्फिग्रेशन मध्ये सादर केला गेला आहे. या डिवाइसच्या 6GB + 64GB वेरिएंटची किंमत CNY 999 (जवळपास 10,700 रुपये), 6GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 1,399 (जवळपास 15,000 रुपये) आणि 8GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 1,599 (जवळपास 17,100 रुपये) आहे. फोन Blue आणि Silver कलर ऑप्शन मध्ये 17 सप्टेंबर पासून विक्रीसाठी येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here